ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर

On: February 4, 2025 11:56 AM
Gold Silver Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate | सोने-चांदीच्या दरांनी नवीन उच्चांक गाठला आहे. होळी सणाआधीच सोने ‘रेकॉर्ड ब्रेक’ किमतीवर पोहोचले आहे. सोमवारी सोन्याच्या किमतींमध्ये ४०० रुपयांची वाढ झाली आणि सोने ८५,००० रुपये प्रति तोळा या पातळीवर पोहोचले. २४ कॅरेट सोन्याने हा नवीन उच्चांक गाठला असून, ऑल टाईम हाय करत सोन्याने नवीन विक्रम नोंदवला आहे. (Gold-Silver Rate)

लग्नसराई, शेअर बाजारातील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आणि सराफा बाजारात वाढलेली मागणी यामुळे सोन्याचे दर वेगाने वाढत आहेत. जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढच होताना दिसत आहे. आता सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

आजचे सोने-चांदीचे दर

शेअर बाजारातील घसरण आणि गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात असल्याने या दरवाढीला आणखी गती मिळाली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, दिल्लीत सोन्याचा दर ८५,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

हा दर मागील विक्रमी किमतीनंतरचा नवीन उच्चांक आहे. जागतिक पातळीवरील तणाव आणि डॉलरच्या घसरणीमुळे भारतात सोन्याच्या किमतींमध्ये सतत वाढ होत आहे. सोन्याला ‘सुरक्षित गुंतवणूक’ समजले जाते, त्यामुळे शेअर बाजारातून लोक सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळत असल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे. (Gold-Silver Rate)

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतींमध्येही तेजी आली आहे. सोमवारी चांदीचा दर ३०० रुपयांनी वाढून ९६,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सराफा बाजारात चांदीच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक वापर आणि दागिन्यांसाठी चांदीची मागणी वाढल्यामुळे ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, चलनवाढ आणि मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरातील बदल यांचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.

Title : Gold-Silver Rate hit record high ahead of holi check latest rates

 

Join WhatsApp Group

Join Now