Gold Silver Price | लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांच्या खरेदीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असतानाच सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price) मोठी उलथापालथ झाली आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी बाजार उघडताच मौल्यवान धातूंमध्ये जोरदार घसरण नोंदवली गेली. विशेषतः चांदीच्या किमतींमध्ये काही मिनिटांत मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही चकित झाले आहेत.
चांदी उच्चांकावरून थेट घसरणीत :
गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात सातत्याने चढउतार सुरू होते. 29 जानेवारी रोजी चांदीने (Silver) इतिहास रचत प्रति किलो 4,20,048 रुपयांचा उच्चांक गाठला होता, ज्यामुळे ती पहिल्यांदाच 4 लाखांच्या पुढे गेली. मात्र त्यानंतर चित्र पूर्णपणे बदलले. सध्याच्या घसरणीमुळे चांदी आपल्या उच्चांकापेक्षा तब्बल 1,80,157 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. (Gold Silver Price News)
या आठवड्याच्या मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) उघडताच 5 मार्च एक्सपायरी असलेल्या चांदीच्या वायद्यांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सोमवारी 2,39,891 रुपये प्रति किलोवर बंद झालेला दर मंगळवारी बाजार सुरू होताच 2,35,206 रुपयांवर आला. म्हणजेच अवघ्या काही मिनिटांतच प्रति किलो 4,685 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा बुडबुडा फुटल्याची चर्चा बाजारात रंगू लागली आहे.
Gold Silver Price | सोन्यालाही बसला धक्का :
चांदीप्रमाणेच सोन्याच्या किमतींमध्येही मोठी हालचाल दिसून आली. 2 एप्रिल रोजी एक्सपायरी असलेल्या सोन्याच्या वायद्यांचा दर 1,54,760 रुपयांवरून खाली येत मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 1,53,550 रुपयांवर पोहोचला. यानुसार MCX वर सोन्याच्या दरात 1,210 रुपयांची घसरण नोंदवली गेली. (Today Gold Silver Price)
यापूर्वी 29 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्यानेही विक्रमी उसळी घेत प्रति 10 ग्रॅम 1,93,096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र त्या टप्प्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने नरमाई दिसू लागली. सध्याच्या घसरणीनुसार सोनं आपल्या सर्वोच्च पातळीपासून 38,336 रुपये प्रति 10 ग्रॅमने खाली आले आहे. त्यामुळे लग्नसराईत खरेदीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही घसरण दिलासादायक मानली जात आहे.






