सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

On: January 27, 2025 12:35 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate l नवीन वर्षात सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्याने (Gold) उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी मात्र घसरण नोंदवली.

शेअर बाजाराप्रमाणे (Share Market) सोन्याचे दर घसरले आहेत. तर चांदी (Silver) तब्बल १००० रुपयांनी घसरली आहे. एमसीएक्सवर (MCX) सकाळी सोने १८६ रुपयांनी घसरून ७९,८४० रुपये प्रति १० ग्रॅम झाले होते, जे शुक्रवारी ८०,०२६ रुपयांवर बंद झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याचा भाव २८०० डॉलरच्या आसपास आहे. या काळात चांदीचा भाव ९५९ रुपयांनी घसरून ९०,६४० रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी तो ९१,५९९ रुपयांवर बंद झाला होता.

जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे जोरदार खरेदी होत असताना, राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सलग आठव्या सत्रात सोन्याचा भाव वाढला आणि तो २०० रुपयांनी वधारून ८३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर होता.

शुद्धतेनुसार सोन्याचे दर :

९९.९ टक्के शुद्धतेचे सोने २०० रुपयांनी वाढून ८३,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. गुरुवारी तो ८२,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
९९.५ टक्के शुद्धतेचे सोने देखील २०० रुपयांनी वाढून ८२,७०० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचले, तर मागील ट्रेडिंग सत्रात ते ८२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
शुक्रवारी चांदीचा भावही ५०० रुपयांनी वाढून ९४,००० रुपये प्रति किलो झाला. गेल्या व्यापार सत्रात चांदी ९३,५०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

Gold-Silver Rate l गुंतवणूकदारांची सावध भूमिका :

बजेट (Budget) आणि फेडरल रिझर्व्हच्या (Federal Reserve) बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसत आहेत. २०२५ मध्ये फेडरल रिझर्व्हच्या पहिल्या बैठकीची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. २८-२९ जानेवारी रोजी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

News Title: gold-silver-prices-fall-after-record-high-silver-down-by-rs-1000

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now