Gold-Silver Price Today | जागतिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (4 मार्च 2025) 24 कॅरेट सोन्याचा दर 89,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला, तर चांदी 98,000 रुपये प्रति किलोवर गेली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे हा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. (Gold-Silver Price Today)
आजचे सोने-चांदीचे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर आज सकाळी वाढताना दिसून आले. आज सोने1100 रुपयांनी वाढून 89,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. सोमवारी हा दर 87,900 रुपये होता.
- 99.9% शुद्ध सोने (24 कॅरेट): 89,000 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 99.5% शुद्ध सोने: 88,600 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी १ लाखाच्या पुढे?
सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ होऊन ती 98,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोमवारी चांदीचा दर 96,500 रुपये प्रति किलो होता. (Gold-Silver Price Today)
आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स सोन्याचा वायदा 32.70 डॉलरने वाढून 2933.80 डॉलर प्रति औंस झाला आहे. काही रिपोर्टनुसार, ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत घट झाल्याने फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोने-चांदीच्या किमती वाढत आहेत. येत्या काळात जागतिक परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Title : Gold-Silver Price Today 5 March 2025






