आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून आजचे दर

On: May 14, 2024 10:42 AM
Gold Prices
---Advertisement---

Gold Price l आजकाल नागरिक सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असतात. अशातच गेल्या महिन्यात सोन्यानी उसळी घेतली आहे. मात्र ग्राहकांना या महिन्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या किंमतीत घसरण :

जर तुम्हीही सोने चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजचे सोन्याचे दर माहित असं महत्वाचं आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,280 रुपये आहे. तसेच याच धरतीची 10 ग्राम सोन्याची मागील ट्रेडमधील किंमत 72,670 रुपये होती.

सोन्याच्या किंमतीत घट झाली असली तरी देखील चांदीने चांगलीच उसळी घेतली आहे. आजचे चांदीचे दर 85,360 रुपये प्रति किलो आहे. चांदीची मागील ट्रेडमधील किंमत 84,730 रुपये प्रतिकिलो होती. आजच्या बाजारभावामुळे चांदीने चांगलाच भाव खाल्ला आहे. तर सोन्याचे दर नरमले आहेत.

Gold Price l 22 आणि 24 कॅरेटमध्ये नेमका काय फरक असतो? :

ग्राहक सोनेखरेदीसाठी सराफाकडे गेल्यास त्यांना सराफ पहिला प्रश्न विचारात. तुम्हाला 22 कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे का? 24 कॅरेटचे खरेदी करायचे आहे? मात्रत्यावेळी ग्राहकाची गडबड होत असते. अशावेळी तुम्हाला 22 आणि 24 कॅरेटमध्ये नेमका काय फरक असतो? हे माहित असं आवश्यक असतं.

तर 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट सोने हे अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जात असतात. तर 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकले जातात.

News Title – Gold-Silver Price Today

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा पाय पसरतोय कोरोना, पुणेकरांसाठी धोक्याची घंटा

बाईक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक लाँच

…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली ठाकरेंची इज्जत

येत्या काही दिवसांत या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळणार

पावसाचं रौद्ररुप! अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now