सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? तर जरा थांबा, जाणून घ्या आजचे दर

On: January 27, 2026 11:30 AM
Today Gold Rate
---Advertisement---

Gold Silver Price | सोन्या-चांदीच्या दरांनी आज पुन्हा एकदा नवे उच्चांक गाठले असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दरवाढ आजही कायम असून, गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि डॉलरमधील चढउतारामुळे देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत.

मंगळवार, 27 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. 5 फेब्रुवारी 2026 रोजी एक्सपायरी असलेले सोन्याचे फ्युचर्स प्रति 10 ग्रॅम 1 लाख 58 हजार 674 रुपयांवर उघडले होते. मागील व्यवहार दिवशी सोनं 1 लाख 56 हजार 037 रुपयांवर बंद झाले होते. सकाळी 9 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास हे दर 1 लाख 58 हजार 310 रुपयांपर्यंत पोहोचले होते, तर सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने 1 लाख 59 हजार 820 रुपयांचा उच्चांक गाठला. (Gold Silver Price)

चांदीच्या दरातही मोठी उसळी :

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. MCX वर 5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेली चांदी प्रति किलो 3 लाख 56 हजार 661 रुपयांवर व्यवहार करत होती. गेल्या आठवड्यातील बंद भावाच्या तुलनेत चांदीत जवळपास 21 हजार रुपयांची वाढ दिसून आली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीने 3 लाख 59 हजार 800 रुपयांचा उच्चांक गाठला असून, यामुळे औद्योगिक वापरासोबतच गुंतवणूकदारांच्याही खरेदी खर्चात मोठी वाढ झाली आहे.

बाजारातील अनिश्चितता, महागाईचा दबाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. येत्या काळातही या दरांमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असून, खरेदीचा निर्णय घेताना ग्राहकांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Gold Silver Price | तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर :

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,62,100 रुपये असून 22 कॅरेटसाठी 1,48,600 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,21,610 रुपये दर आहेत. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 1,61,950 रुपये, 22 कॅरेट 1,48,450 रुपये आणि 18 कॅरेट 1,21,460 रुपयांवर पोहोचले आहे. (Today Gold Silver Price)

चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,63,200 रुपये असून 22 कॅरेटसाठी 1,49,600 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,24,750 रुपये दर आहेत. कोलकातामध्ये 24 कॅरेट सोनं 1,61,950 रुपये, 22 कॅरेट 1,48,450 रुपये आणि 18 कॅरेट 1,21,460 रुपये दराने विकले जात आहे. अहमदाबाद, लखनऊ आणि पटनामध्येही साधारण हेच दर असून 24 कॅरेट सोनं सुमारे 1,62,000 ते 1,62,100 रुपये प्रति 10 ग्रॅम दरम्यान आहे. (gold rate in Mumbai)

आज सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे दागिने खरेदी अधिक महाग झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीपूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासून निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

News Title: Gold Silver Price Today 27 January 2026: Gold and Silver Rates Hit Record Highs

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now