Gold-Silver Price Today | या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकवर्गात खरेदीसाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात दरात मोठी वाढ झाली होती, मात्र सध्या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण होत असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. (Gold-Silver Price Today)
सोन्याच्या दरात सलग दोन दिवस घसरण
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली होती, परंतु या आठवड्यात सुरुवातीच्या दोन दिवसांत सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी सोन्याचा दर 210 रुपयांनी खाली गेला, तर मंगळवारी 330 रुपयांची आणखी घट झाली. गुडरिटर्न्सच्या (Goodreturns) माहितीनुसार, सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मागील काही दिवसांत 90 हजाराचा टप्पा गाठणाऱ्या सोन्याने माघार घेतली आहे, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) सकाळच्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोनं 87,751 रुपये, 23 कॅरेट 87,400 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 80,380 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. याशिवाय, 18 कॅरेट सोन्याचा दर 65,813 रुपये आणि 14 कॅरेट सोनं 51,334 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवले गेले आहे.
चांदी स्थिर, पण मागील आठवड्यात मोठी घट
चांदीच्या दरात मागील तीन दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. मात्र त्यापूर्वी चांदीत तब्बल 4100 रुपयांची घसरण झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा दर 1,01,000 रुपये आहे. दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर किंवा शुल्क लागू नसल्याने तेथील दर सराफा बाजारापेक्षा वेगळे असतात. (Gold-Silver Price Today)
ग्राहकांना घरबसल्या सोनं-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, दररोज (शनिवार, रविवार आणि सुट्ट्या वगळता) IBJA दर जाहीर करते, आणि त्यात स्थानिक कर आणि शुल्काचा समावेश असतो, त्यामुळे शहरागणिक किंमतीत थोडीफार तफावत आढळते.
Title : Gold-Silver Price Today 26 March 2025






