Gold-Silver Price Today | सप्ताहाच्या सुरुवातीला सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मागील काही महिन्यांत सातत्याने वाढलेले दर आता काहीसे स्थिर होत असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Gold-Silver Price Today )
सोने स्वस्त, दरात दिसली घसरण
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या सोमवारी सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली. मागील आठवड्यात सोने 550 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर पुन्हा एकदा 1100 रुपयांनी महागलं होतं. मात्र 25 मार्चच्या व्यवहारात सोनं तब्बल 210 रुपयांनी स्वस्त झालं. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 82,300 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,770 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 87,719 रुपये, 23 कॅरेटचा 87,368 रुपये, तर 22 कॅरेटचा दर 80,351 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला. 18 कॅरेट सोन्याचा दर 65,789 रुपये आणि 14 कॅरेटचा दर 51,316 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
चांदीच्या दरातही घसरण कायम
गेल्या तीन महिन्यांत चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली होती. काही दिवस दर स्थिर राहिल्यानंतर, मागील आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी महाग झाली होती. त्यानंतर लगेचच 2100 रुपयांनी दर घसरले. 25 मार्च रोजी चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा दर 1,01,000 रुपये इतकाच आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर किंवा शुल्क लागू न पडल्यामुळे दर कमी असतात, तर सराफा बाजारात स्थानिक कर आणि मेकिंग चार्जेसमुळे किंमतीत चढ-उतार दिसून येतो. (Gold-Silver Price Today)
मोबाइलवरच जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर
ग्राहक आता घरबसल्या सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज हे दर प्रसिद्ध करते. मात्र केंद्र सरकारच्या सुट्यांव्यतिरिक्त, शनिवार आणि रविवार हे दर जाहीर केले जात नाहीत. दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन माहिती मिळवता येते.
Title : Gold-Silver Price Today 25 March 2025









