Gold-Silver Price Today | सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. मंगळवारी किंमतीत घसरण झाल्यानंतर बुधवारी या मौल्यवान धातूंनी जोरदार उसळी घेतली. आजही सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. (Gold-Silver Price Today)
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत चढ-उतार करत आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली होती, तर मंगळवारी 330 रुपयांची घट झाली. मात्र, बुधवारी सोन्याने 490 रुपयांची मोठी उडी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 80,800 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव लाखाच्या घरात
या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत चांदी प्रति किलो 1,100 रुपयांनी स्वस्त झाली होती, मात्र बुधवारी एका दिवसात तब्बल 2,000 रुपयांनी उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव 1,00,100 रुपये आहे.
विविध कॅरेटनुसार सोन्याचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या अहवालानुसार, आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोने 86,143 रुपये, 23 कॅरेट सोने 85,798 रुपये, 22 कॅरेट सोने 78,907 रुपये, 18 कॅरेट सोने 64,607 रुपये, आणि 14 कॅरेट सोने 50,394 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, एक किलो चांदीचा दर 98,100 रुपये आहे. (Gold-Silver Price Today)
घरबसल्या जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर
सोन्या-चांदीचे ताजे दर तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज हे दर जाहीर करते. मात्र, शनिवारी, रविवारी आणि शासकीय सुट्यांमध्ये दर जाहीर केले जात नाहीत. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे दर मिळवू शकतात.









