Gold & Silver Rate | देशात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही झाला असून आज शुक्रवारी सोन्याचे दर आधीपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.
दरम्यान जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर आणि डॉलरच्या मजबुतीवर होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता असल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव वाढल्याचे चित्र दिसत आहे.
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर :
आज 3 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,49,110 रुपयांपर्यंत आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,36,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold & Silver Rate)
मुंबई, पुणे आणि कोलकाता या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,48,960 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,36,540 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,49,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 22 कॅरेट सोन्याचा दर 1,37,490 रुपये इतका आहे.
Gold & Silver Rate | चांदीचे दरही घसरले :
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी चांदीचा दर प्रति किलो सुमारे 2,49,900 रुपयांवर आला आहे. मागील दिवशी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमतीत जवळपास 9,000 रुपयांची घसरण नोंदवली गेली होती. (Today Silver Rate)
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात वाढलेला भू-राजकीय तणाव, डॉलरची मजबुती आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार यामुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांतही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






