ऐन लग्नसराईत सोन्याला चढला दरवाढीचा रंग, 10 ग्रॅमसाठी आज मोजावे लागतील तब्बल ‘इतके’ हजार!

On: May 6, 2025 9:03 AM
Today Gold Price
---Advertisement---

Gold Price Today | गेल्या काही आठवड्यांपासून सतत चढउतार पाहणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. आज  सोन्याचे दर वधारले असून चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. देशातील प्रमुख शहरांतील बाजारात सध्याचे दर काय आहेत, हे पाहूया. (Gold Price Today)

प्रमुख शहरांतील सोने दर

मुंबईत 22 कॅरेट सोने सध्या 87,750 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे, तर 24 कॅरेट सोने 95,730 रुपये प्रति 10 ग्रॅम या भावाने उपलब्ध आहे. दिल्लीत 22 कॅरेटचा दर 87,900 रुपये असून, 24 कॅरेटचा दर 95,880 रुपये इतका आहे. कोलकात्यातही हेच दर कायम असून चेन्नईमध्ये देखील 87,750 (22 कॅरेट) आणि 95,730 (24 कॅरेट) रुपये दर आहे.

सोन्याच्या दरात मोठी उडी सोमवारी पाहायला मिळाली. जळगाव सराफा बाजारात शनिवारीच्या तुलनेत सकाळी 206 रुपयांनी, तर दुपारी 1648 रुपयांनी दर वाढला. त्यामुळे दिवसभरात तब्बल 1854 रुपयांची वाढ झाली. परिणामी 10 ग्रॅमसाठी तब्बल 98,000 रुपये द्यावे लागले. आज 6 मे रोजी सकाळच्या सत्रात देखील सोन्यात दरवाढीचे संकेत आहेत.

अमेरिकेतील व्यापार धोरणांतील अनिश्चितता, भारत-पाकिस्तानमधील तणाव, तसेच जागतिक भूराजकीय परिस्थितीमुळे ग्राहक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पुन्हा सोन्याकडे वळताना दिसत आहेत. डॉलरच्या घसरणीमुळे देखील सोन्याच्या किंमतीत चढ दिसत आहे. विशेष म्हणजे, जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत, यामुळेही किंमतीवर परिणाम होत आहे.

सोन्यात मोठ्या घसरणीची शक्यता?  

काही प्रसिद्ध तज्ज्ञांनी भाकीत केलं आहे की सोने लवकरच 1820 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत घसरेल. सध्या 3,198 डॉलर प्रति औंस या दराच्या तुलनेत ही घसरण 43 टक्क्यांपर्यंतची ठरू शकते. भारतात 10 ग्रॅम सोन्याचा सध्याचा दर 95,660 रुपये असून, 43% घसरणीच्या संभाव्यतेनुसार हा दर 54,526 रुपयांपर्यंत येऊ शकतो.

Title: Gold Price Today 6 May 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now