Gold Price Today | गुढीपाडवा आणि ईदच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सोन्याचे दर पुन्हा एकदा तेजीत आहेत. मागील आठवड्याभरात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून, आजदेखील किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. मार्च अखेरीच्या आर्थिक हालचाली, सणासुदीचा काळ आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे ही वाढ झाल्याचे जाणकार सांगतात. (Gold Price Today)
24 कॅरेट सोनं 92 हजार पार; चांदीही महागली
आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति 10 ग्रॅमचा दर 92,060 रुपयांवर पोहोचला आहे. याचप्रमाणे, 100 ग्रॅम सोन्याचा दर 7100 रुपयांनी वाढून 9,20,600 रुपये इतका झाला आहे. 29 मार्च रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 91,350 रुपये होते, त्यामुळे दोन दिवसांतच सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 90 हजारांच्या पुढे गेला आहे, तर 22 कॅरेट सोनं 82 हजार रुपयांवर स्थिरावले आहे. याशिवाय, चांदीच्या दरातही वाढ झाली असून, आज एक किलो चांदी 1,03,900 रुपये दराने विकली जात आहे.
मुंबईतील दर आणि वर्षभरातील वाढीचा आलेख
मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,191 रुपये आहे. तर, 18 कॅरेट सोनं 530 रुपयांनी वाढून 69,060 रुपये झाले आहे. 22 कॅरेट सोनं 82,360 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच सामान्य ग्राहकांसाठीही सोन्याच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत.
वर्षभरात सोन्याच्या दराने तब्बल 22 हजार रुपयांची झेप घेतली आहे. मार्च 2024 मध्ये सोन्याचे दर 60,800 रुपये प्रति तोळा होते, तर नोव्हेंबर 2024 मध्ये ते 70,700 रुपये झाले. जानेवारी 2025 मध्ये हे दर 74,600 रुपये झाले आणि आता मार्च 2025 मध्ये हे दर 92,200 रुपये प्रति तोळा झाले आहेत.
Title : Gold Price Today 31 March 2025






