सोन्याचा भाव १ लाख रुपये होणार?, आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड समोर

On: February 16, 2025 2:35 PM
Gold Price
---Advertisement---

Gold Price Hike | सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव ८५,८६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. अनेक घटक सोन्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा भाव १ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (Gold Price Hike)

सोने दरवाढीची प्रमुख कारणे

१. भू-राजकीय तणाव (Geopolitical Tension): जगात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत.

२. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण: रुपयात घसरण झाल्यामुळे आयात केलेले सोने महाग होते, परिणामी भारतात सोन्याचे दर वाढतात. सीएनबीसीच्या (CNBC) अहवालानुसार, रुपया अजून घसरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोने आणखी महाग होऊ शकते.

३. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा टॅरिफ निर्णय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ योजनांमुळे जागतिक व्यापार युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याला अधिक सुरक्षित समजत आहेत.

४. केंद्रीय बँकांची सोन्याची खरेदी: जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे आणि दरही वाढत आहेत. (Gold Price Hike)

५. महागाई: महागाई वाढल्याने सोन्याची मागणी वाढते, कारण लोक महागाईपासून वाचण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात.

६. रशिया-युक्रेन शांतता चर्चा: रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेत ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यास भू-राजकीय तणाव कमी होऊ शकतो, ज्यामुळे सोन्याच्या किमती खाली येऊ शकतात.

सोन्याच्या दरवाढीवर तज्ज्ञांचं मत काय?

आस्पेक्ट ग्लोबल वेंचर्स प्राइवेट लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) (India Bullion and Jewellers Association) उपाध्यक्ष अक्षा कंबोज यांच्या मते, “सोनं नेहमीच एक सुरक्षित गुंतवणूक राहिलेलं आहे. सध्याची आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थिती पाहता, सोन्याच्या दरात वाढ होणं अपेक्षितच होतं. जागतिक मागणी, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि महागाई यांसारख्या गोष्टींमुळे सोन्याचा भाव १ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.”

सराफा बाजारातील सोन्याचे दर

आज सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर ७९,९५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दरवाढ चिंतेचा विषय ठरत आहे. (Gold Price Hike)

सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असली तरी, गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, बाजारातील चढ-उतारांचा विचार करून माहितीपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे.

Title : Gold Price Hike Expected to Reach 1 Lakh in February 

 

Join WhatsApp Group

Join Now