Gold and Silver Rate l या आठवड्यात सोन्याच्या (Gold) दरात मोठी वाढ झाली, तर चांदीच्या (Silver) दरात घसरण दिसून आली. सोन्याचा दर दोन हजार रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला, तर सोने मोडणाऱ्यांना फायदा झाला. (Gold Silver Price Today 22 February 2025)
गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या (Gold) दरात सातत्याने वाढ होत होती. चार दिवसांत सोने 2000 रुपयांनी महागले. सोमवारी 550 रुपये, मंगळवारी 330 रुपये, बुधवारी 700 रुपये आणि गुरुवारी 400 रुपयांनी सोन्याचे दर वाढले. मात्र, शुक्रवारी सोन्याचा दर 640 रुपयांनी घसरला. गुडरिटर्न्सनुसार (Goodreturns), 22 कॅरेट सोन्याचा दर 80,300 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
चांदीच्या दरात घसरण :
5 फेब्रुवारी रोजी चांदीच्या (Silver) दरात 1000 रुपयांनी आणि 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा 1000 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात घसरण दिसून आली. शुक्रवारी चांदीचा दर 100 रुपयांनी घसरला. गुडरिटर्न्सनुसार (Goodreturns), एक किलो चांदीचा दर 1,00,300 रुपये आहे.
Gold and Silver Rate l आजचे सोन्या-चांदीचे दर :
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आज (सकाळच्या सत्रात) 24 कॅरेट सोन्याचा दर 86,092 रुपये, 23 कॅरेट सोन्याचा दर 85,747 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 78,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 64,569 रुपये, तर 14 कॅरेट सोन्याचा दर 50,364 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलो चांदीचा दर 97,147 रुपये आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कर समाविष्ट असल्याने दरात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या दर :
तुम्ही घरबसल्या सोने-चांदीचे (Gold-Silver) दर जाणून घेऊ शकता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवार आणि रविवार वगळता दररोज दर जाहीर करते. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही सर्व कॅरेटचे दर जाणून घेऊ शकता. स्थानिक कर आणि इतर शुल्क धरून शहरानुसार दरांमध्ये फरक असू शकतो.
News title : Gold and Silver Price Fluctuation: Impact on Customers






