Politics| रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटात वर्चस्वाची चुरस अधिक तीव्र झाली आहे. पालकमंत्री पदावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी राष्ट्रवादीला (NCP) मोठा झटका देणारा निर्णय घेतला आहे.
नवगणे यांच्या प्रवेशाने रायगडमध्ये राजकीय भूकंप
राज्याचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील माजी राष्ट्रवादी उमेदवार अनिल नवगणे (Anil Navgane) यांचा शिंदे गटात प्रवेश जाहीर करत रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट घडवला आहे. नवगणे यांनी विधानसभा निवडणुकीत अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती.
या कार्यक्रमानिमित्त म्हसळा येथे रविप्रभा संस्थेच्या गुणगौरव सोहळ्यात भरत गोगावले आणि अनिल नवगणे एका व्यासपीठावर आले. यावेळी नवगणे यांचा पक्षप्रवेश गोगावले यांनी अधिकृतपणे घोषित केला. या प्रवेशामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
नवगणे यांचा अनुभव आणि गोगावलेंचा राजकीय डाव
अनिल नवगणे हे पूर्वी शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवली. शरद पवारांनी त्यांच्या प्रचारासाठी म्हसळा येथे सभा घेतली होती, तरीही त्यांचा पराभव झाला होता.
नवगणे यांना श्रीवर्धन परिसरात मजबूत जनाधार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटात प्रवेशामुळे भरत गोगावले यांना सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अदिती तटकरे यांना राजकीय शह देण्याची संधी मिळणार आहे. यामुळे रायगडमधील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Title: Gogawale’s Politics Twist: Navgane Joins Shinde Sena






