Hacking | Google ने युजर्ससाठी अत्यंत महत्वाची सूचना केली आहे. जवळपास 2.5 अब्ज म्हणजेच 250 कोटी Gmail वापरकर्त्यांचे अकाउंट AI च्या मदतीने हॅक केले जाऊ शकतात. सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांना Google सपोर्टच्या नावाने कॉल करून हा मोठा घोटाळा करत आहेत. त्यामुळे Google ने वापरकर्त्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे आणि अशा कोणत्याही खोट्या कॉलवर विश्वास न ठेवण्याचा आणि त्यांच्या Gmail अकाउंटचा पासवर्ड त्वरित रिसेट करण्याचा सल्ला दिला आहे. (Hacking)
हॅकर्स वापरत आहेत ‘ही’ पद्धत
एका अहवालानुसार, Google ने कोट्यवधी Gmail वापरकर्त्यांना इशारा दिला आहे की, सायबर गुन्हेगार Google सपोर्टच्या नावाने कॉल करत आहेत. त्यांच्याद्वारे वापरली जाणारी कॉलर आयडी अगदी खरी दिसते, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या जाळ्यात अडकतात. हॅकर्स Gmail वापरकर्त्यांना Google सपोर्ट एजंटच्या नावाने कॉल करतात आणि सांगतात की त्यांचे अकाउंट हॅक झाले आहे आणि त्यांच्या ई-मेलवर आलेला रिकव्हरी कोड वापरून अकाउंट रिकव्हर करण्यास सांगतात. इतकेच नाही तर हॅकर्सनी पाठवलेला ई-मेल आणि रिकव्हरी कोड देखील खरा वाटतो.
त्वरित करा ‘हे’ काम
जर तुम्हाला असा कोणताही ई-मेल किंवा कॉल आला तर त्याकडे दुर्लक्ष करा.
चुकून जर तुम्ही हॅकर्सनी पाठवलेला रिकव्हरी कोड वापरून अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्ही तुमच्या Gmail अकाउंटचा पासवर्ड त्वरित रिसेट करा.
तसेच, नेहमी Gmail अकाउंटला टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे सुरक्षित करा, जेणेकरून तुमच्या अकाउंटला आणखी एक सुरक्षा स्तर मिळेल.
सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांच्या ई-मेल अकाउंटचा ऍक्सेस मिळवण्यासाठी सतत अशा पद्धती वापरत आहेत. हॅकर्सची ही पद्धत प्रभावी ठरते कारण त्यांना कोणत्याही सुरक्षा नियंत्रणाला बायपास करण्याची गरज भासत नाही. (Hacking)
Gmail चा पासवर्ड कसा रिसेट करायचा?
Gmail चा पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुमच्या Android डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जा.
त्यानंतर, Google मध्ये जाऊन तुमचे नाव, मग तुमचे Google अकाउंट व्यवस्थापित करा या पर्यायावर टॅप करा.
सर्वात वर, सुरक्षा वर टॅप करा.
नंतर “तुमचे Google खाते साइन-इन करण्याची पद्धत” वर जा आणि पासवर्ड वर टॅप करा.
येथे तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
नंतर तुमचा नवीन पासवर्ड टाका आणि त्यानंतर, पासवर्ड बदला वर टॅप करा. (Hacking)
जर तुम्हाला तुमच्या Gmail अकाउंटचा पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही ‘पासवर्ड विसरलात’ या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षा प्रश्नांची उत्तरे द्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या Gmail अकाउंटचा पासवर्ड बदलू शकाल.
Title : gmail accounts at risk of hacking google warns users






