अत्यंत धक्कादायक प्रकार! कुष्ठरोग नसतानाही दिल्या गोळ्या; विद्यार्थिनीचा मृत्यू

On: February 3, 2025 11:28 AM
Wrong Treatment
---Advertisement---

Wrong Treatment l पेण (Pen) तालुक्यातील वरवणे (Varavane) येथील शासकीय आश्रमशाळेत (Government Ashram School) चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा (Student) कळंबोलीच्या (Kalamboli) एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी (Father) गंभीर आरोप केला असून, कुष्ठरोगी (Leper) नसतानाही कुष्ठरोगाची चुकीची औषधे (Medicines) दिल्यामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नेमके काय घडले? :

खुशबू नामदेव ठाकरे (Khushboo Namdev Thackeray) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वाकरूळ (Vakarul) यांनी शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत (Kusum Yojana) १६ डिसेंबर २०२४ रोजी वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत आरोग्य शिबिर (Health Camp) घेतले होते. या शिबिरात खुशबूच्या अंगावर चट्ट्यांसारखे डाग (Rashes) दिसल्याने तिला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आणि तिच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. मात्र, १० जानेवारीनंतर खुशबूच्या अंगावर फोड (Blisters) उठले आणि हातपायांना सूज (Swelling) आली. त्यामुळे तिला तातडीने पेण ग्रामीण रुग्णालयात (Pen Rural Hospital) दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पनवेल (Panvel) येथील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) हलवण्यात आले. तेथे १६ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने, २२ जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Wrong Treatment l प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू :

या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) पेण प्रकल्प अधिकारी (Project Officer) कार्यालयाने वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक (Headmaster) आणि अधीक्षिका (Superintendent) यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावली आहे.

आरोग्य शिबिरात चुकीचे निदान? :

खुशबूच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य शिबिरात तिला कुष्ठरोग असल्याचे चुकीचे निदान झाले होते. त्यामुळे आरोग्य केंद्राने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या जात होत्या. ताप आल्यानंतर तिला वाकरूळ आरोग्य उपकेंद्रात दाखल केले होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

एमजीएम रुग्णालयाचे स्पष्टीकरण :

एमजीएम रुग्णालयाचे समाजसेवक एकनाथ बागुल यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले, “त्या मुलीला देखरेखीसाठी एमजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. पालकांनी आमच्यावर कोणतेही आरोप केलेले नाहीत. शवविच्छेदन (Postmortem) अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. संबंधित प्रकरणाची कागदपत्रे आश्रमशाळा, पालिका, पंचायत समितीला (Panchayat Samiti) उपलब्ध करून दिली आहेत.”

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका निष्पाप मुलीचा अशाप्रकारे मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

News Title: Girl Dies After Wrong Treatment for Leprosy, Father Alleges Negligence

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now