‘ट्रोलिंगला कंटाळून मी…’, छोट्या पुढारीने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, सगळीकडे खळबळ!

On: June 27, 2025 6:34 PM
ghanashyam darode
---Advertisement---

Ghanshyam Darode | बिग बॉस’ (Bigg Boss) या रिॲलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेला ‘छोटा पुढारी’ घनश्याम दरवडे (Ghanshyam Darvade) याने सोशल मीडियावरील सततच्या ट्रोलिंगला कंटाळून आत्महत्येचा इशारा दिला आहे. आपल्या उंचीवरून होणाऱ्या अपमानास्पद टिप्पणीमुळे आणि कुटुंबीयांनाही यात ओढले जात असल्याने, त्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) तक्रार दाखल केली असून, कारवाईसाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.

नक्की काय घडलं?

घनश्यामने (Ghanshyam Darode) श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काही सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधात रीतसर तक्रार नोंदवली आहे. काही टवाळखोर लोक सातत्याने त्याच्या उंचीवरून त्याला चिडवत असून, अपमानास्पद शेरेबाजी करत आहेत, ज्यामुळे त्याला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. या ट्रोलर्सनी आता त्याच्या आई-वडिलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने तो अधिकच व्यथित झाला आहे.

जिवंतपणी मारलं जातंय-

“मला जिवंतपणी मारलं जातंय,” अशा शब्दांत आपली वेदना व्यक्त करत घनश्यामने या ट्रोलर्सवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याने (Ghanshyam Darode) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रशासनाला १० दिवसांचा अवधी दिला आहे. या काळात जर संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर आपण आत्महत्या करू, असे त्याने म्हटले आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘बिग बॉस’मधून प्रसिद्धी मिळवलेला घनश्याम सध्या चित्रपट आणि इतर शोमध्ये कार्यरत आहे. मात्र, या प्रसिद्धीसोबतच आलेल्या सायबर बुलिंगमुळे तो खचला आहे. “मी जन्माला येऊन चूक केली का?” असा संतप्त आणि भावनिक सवाल विचारत त्याने या गंभीर विषयाकडे समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

News Title – Ghanshyam Darode post goes viral on social media

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now