‘त्या’ कारणावरून गौरव खन्नाचा १० वर्षांचा संसार धोक्यात? अखेर आकांक्षाने घटस्फोटाच्या अफवांवर सोडलं मौन!

On: June 29, 2026 2:59 PM
Gaurav Khanna
---Advertisement---

Gaurav Khanna | टीव्ही अभिनेता गौरव खन्ना आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जवळपास दहा वर्षांचा संसार केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये आकांक्षाने केलेल्या खुलाशानंतर चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून तिची जुनी मुलाखतही पुन्हा चर्चेत आली आहे.

रिअॅलिटी शोमध्ये आकांक्षाचा मोठा खुलासा :

‘लॉकअप 2’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्याच भागात आकांक्षा चमोला हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, ती आणि गौरव खन्ना गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत असून आता त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खुलाशानंतर दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

24 नोव्हेंबर 2016 रोजी गौरव आणि आकांक्षा विवाहबंधनात अडकले होते. लग्नाला जवळपास दहा वर्षे पूर्ण होत आली असतानाही त्यांनी अपत्याला जन्म दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 19’मध्ये गौरवने याबाबत भाष्य करत सुरुवातीला वडील होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. मात्र, आकांक्षा त्यावेळी मानसिकदृष्ट्या तयार नसल्यामुळे तिच्या निर्णयाचा आपण आदर केल्याचेही त्याने स्पष्ट केले होते.

Gaurav Khanna | व्हायरल मुलाखतीतील वक्तव्य चर्चेत :

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आकांक्षा चमोलाची काही महिन्यांपूर्वीची एक मुलाखत सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाली आहे. तिला वैवाहिक आयुष्यातील शारीरिक संबंधांबाबत असमाधान असल्यास त्यावरून घटस्फोटाचा अधिकार असावा का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या उत्तरामुळे आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना आकांक्षाने सांगितले होते की, एखादी महिला वैवाहिक नात्यात शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या समाधानी नसल्यास त्याचा नात्यावर परिणाम होऊ शकतो आणि ते विभक्त होण्यामागील एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. समाजात महिलांच्या वैयक्तिक भावना आणि इच्छांबाबत आजही मोकळेपणाने चर्चा होत नसल्याचे तिने नमूद केले होते. मात्र, तिच्या या जुन्या वक्तव्याचा आणि सध्या समोर आलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाचा थेट संबंध असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

News Title: Gaurav Khanna Divorce Buzz Grows

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now