केतन दरीत पडला, सियाने पहिला फोन कोणाला केला? तपासात नवा खुलासा

On: June 29, 2026 2:13 PM
Ketan Agrawal Case
---Advertisement---

Ketan Agrawal Case | पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासातून घटनास्थळी घडलेल्या काही महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या असून, केतन दरीत कोसळल्यानंतर सिया गोयलने केलेल्या हालचालींनी तपासाला नवे वळण मिळाले आहे.

दरीत पडलेल्या केतनला मदत नाही, पहिला फोन आईला :

तपासातील माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावर चेतन चौधरीने केतन अग्रवालला दरीत ढकलल्यानंतर सिया गोयलने कोणतीही घाबरलेली प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ती काही वेळ घटनास्थळी शांत उभी राहिली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या केतनला मदत मिळावी यासाठी तिने तत्काळ स्थानिक नागरिक किंवा पोलिसांशी संपर्क साधला नाही, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

याऐवजी सियाने सर्वप्रथम तिच्या आईला फोन करून केतन किल्ल्यावरून खाली पडल्याची माहिती दिली. या संपूर्ण प्रक्रियेत जवळपास 15 मिनिटांचा विलंब झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या विलंबामुळे केतनला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

Ketan Agrawal Case | लोहगडावर क्राइम सीनचे पुनर्निर्माण :

या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून रविवारी पोलिसांनी आरोपी सिया गोयलला (Siya Goyal) लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळावरील संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली. डमीचा वापर करून पोलिसांनी 18 जून रोजी नेमके काय घडले, याचा तपशीलवार आढावा घेतला. तपासादरम्यान सियाने घटनास्थळी पोहोचण्यासाठी वापरलेला मार्ग तसेच कथित घटना कशी घडली, याची माहिती पोलिसांना दाखवून दिली.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात 20 वर्षीय सिया गोयल आणि 22 वर्षीय चेतन चौधरी यांच्यावर 25 वर्षीय केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून ठार मारल्याचा आरोप आहे. चेतन चौधरीचाही स्वतंत्रपणे क्राइम सीन रीक्रिएशन करण्यात येणार आहे. दरम्यान, सियाने चौकशीत केतनसोबत लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले असून, लग्न मोडल्यास कुटुंबाची बदनामी होईल या भीतीतून चेतनसोबत मिळून हत्येचा कट रचल्याची कबुली तिने दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

News Title: Ketan Murder: New Police Revelations

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now