1 एप्रिलपासून LPG सिलिंडरवर नवे नियम लागू; आता महिन्याला किती सिलिंडर मिळणार?

On: March 29, 2026 3:57 PM
LPG Crisis Update
---Advertisement---

Gas Booking Rules | देशात सध्या निर्माण झालेली एलपीजी सिलेंडरची टंचाई आणि ग्राहकांची होणारी धावपळ लक्षात घेता, केंद्र सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आखाती देशांतून नैसर्गिक वायू घेऊन आलेली जहाजे भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाली असून, पुढील दोन महिने पुरेल इतका इंधन आणि गॅस साठा उपलब्ध असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, या संकटकाळात गॅस वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने बुकिंगचे काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत.

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान पुरवठा व्हावा यासाठी खालील मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. महिन्याची मर्यादा: एका ग्राहकाला एका महिन्यात जास्तीत जास्त दोनच घरगुती सिलेंडर बुक करता येतात.२५ दिवसांचा नियम: दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे अनिवार्य आहे. यापेक्षा कमी कालावधीत बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास सिस्टिम ते स्वीकारत नाही.वार्षिक कोटा: एका आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) एकूण १५ सिलेंडर मिळू शकतात.

अतिरिक्त सिलेंडर हवा असल्यास काय करावे?

जर तुमचा वार्षिक १५ सिलेंडरचा कोटा पूर्ण झाला असेल आणि तरीही तुम्हाला तातडीने सिलेंडर हवा असेल, तर त्यासाठी ‘Hello BPCL’ ॲपच्या माध्यमातून विशेष पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे:

तुमच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या किती आहे?

तुमच्या घरी लग्नसराई किंवा इतर कोणताही विशेष कार्यक्रम आहे का?

कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांची अंदाजित संख्या किती आहे?

या माहितीच्या आधारे तुमची निकड तपासूनच अतिरिक्त सिलेंडर देण्याबाबतचा निर्णय घेतला जातो.

दरम्यान, देशाकडे सध्या पुढील ६० दिवसांचा पुरेसा इंधन आणि गॅस साठा उपलब्ध आहे.इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विस्कळीत झाला असला तरी, इतर ४० हून अधिक देशांकडून भारताला गॅस पुरवठा होण्यास सुरुवात होणार आहे. नैसर्गिक वायूने भरलेली जहाजे भारतीय बंदरांवर पोहोचली असून लवकरच घरपोच वितरणाची प्रतीक्षा यादी (Waiting List) कमी होईल. सध्याच्या पॅनिक स्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या गॅस एजन्सीकडे ऑनलाइन बुकिंग करा आणि अधिकृत ॲपचा वापर करून वितरणाची स्थिती तपासा.

Join WhatsApp Group

Join Now