पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याला पूर्णविराम, काय आहे मोदी सरकारची नवी योजना?

On: March 25, 2026 4:51 PM
Petrol-Diesel Rate likely to fall
---Advertisement---

Fuel Supply | पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या अफवांवर केंद्र सरकारने पूर्णविराम दिला असून, देशात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधनाची कमतरता भासेल, या भीतीने नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की, देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. पेट्रोल पंपांवर दिसणाऱ्या रांगा या केवळ अफवांमुळे आलेल्या घबराटीतून (Panic Buying) लागल्या आहेत. भारताची वार्षिक इंधन शुद्धीकरण क्षमता सुमारे २६० दशलक्ष टन असून, सध्या सर्व रिफायनरी त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. पुरवठा करणाऱ्या टर्मिनल्सवरही पुरेसे इंधन उपलब्ध आहे.

इंधनाच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे बाजारातील स्थिती पूर्णपणे सामान्य आहे. इंधनावरील ताण कमी करण्यासाठी आणि पर्यायी ऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारकडून नवी योजना राबवली जात आहे. घरगुती वापरासाठी पीएनजी (PNG) जोडण्यांना आणि वाहतुकीसाठी १००% सीएनजी (CNG) पुरवठा सुनिश्चित करण्यावर सरकारचा भर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पश्चिम आशियातील तणावावर नुकतीच अत्यंत महत्त्वाची चर्चा पार पडली. “युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही,” ही भारताची ठाम भूमिका मांडत पंतप्रधान मोदींनी तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणी राजदूतांची भेट घेतली. या युद्धजन्य परिस्थितीत इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल आणि त्यांना मदत केल्याबद्दल भारताने इराणी सरकारचे विशेष आभार मानले आहेत.

Join WhatsApp Group

Join Now