पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार? केंद्र सरकारचा ‘प्लॅन बी’, आता तुटवडा भासणार नाही

On: March 22, 2026 4:45 PM
Iran India Oil Trade
---Advertisement---

Fuel Crisis India | मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधन पुरवठ्याबाबत चिंता वाढली असली तरी केंद्र सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी तयारी सुरू केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील संकट लक्षात घेऊन ‘प्लॅन B’ लागू करण्यात आला असून देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

होर्मुझ तणावावर जागतिक दबाव

होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता व्यक्त होत असताना 22 देशांनी इराणला हा महत्त्वाचा सागरी मार्ग खुला ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, काही भारतीय तेल आणि LPG टँकर सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्राने आपत्कालीन योजना सक्रिय केली आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच सागरी सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. देशातील सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेने चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून आखातातील भारतीय जहाजांवरही लक्ष ठेवले जात आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून इंधन साठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कच्च्या तेलाचा साठा राखीव ठेवण्यात आला असून आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जाईल. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत सुरू असून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लोकांना 5 किलोच्या सिलेंडरचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

PNG कनेक्शनवर भर

एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन वाढवण्यावर भर दिला आहे. गॅस कंपन्यांना मंजुरी प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, कोळशाचा पुरवठा वाढवणे आणि रॉकेल वितरणास मंजुरी देणे यांसारखे पर्यायही उपलब्ध ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत ऊर्जा पुरवठा खंडित होणार नाही.

ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. सागरी मार्गांवरील हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात असून भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पावले उचलली जात आहेत. याशिवाय, भारताने अरब देशांशी संपर्क साधून जहाजांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मागितले आहे, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Join WhatsApp Group

Join Now