चिकन पार्टी बेतली जीवावर! मित्रानेच केली मित्राची हत्या, कारण ऐकून हादरून जाल

On: January 31, 2025 1:27 PM
Friend Kills Friend Over Chicken Party Dispute In Kharghar Navi Mumbai
---Advertisement---

Navi Mumbai | नवी मुंबईत (Navi Mumbai) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये वाढ झाली असून क्षुल्लक  कारणावरून (Trivial Reason) एका व्यक्तीने त्याच्याच मित्राचा जीव (Murder) घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिकनची पार्टी (Chicken Party) करणे तरुणाच्या जीवावर बेतले. पार्टीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयंकर प्रकार खारघरमध्ये (Kharghar) घडला आहे. जयेश वाघे (Jayesh Waghe) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मन्नू दिनेश शर्मा (Mannu Dinesh Sharma) याला अटक केली असून त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात (Kharghar Police Station) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयेश हा पनवेल महानगरपालिकेत (Panvel Municipal Corporation) मलनिसारण (Sewerage) वाहनावर सफाईचे काम करत होता. 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास आदिवासी वाडी (Adivasi Wadi), बेलपाडा (Belpada), खारघर येथे क्रिकेट मैदानाच्या (Cricket Ground) बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र चिकन बनवत होते. मात्र मन्नूकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी (Contribution) येत नाही, पैसे मिळाले नाहीत याच कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद (Argument) झाला आणि शिवीगाळ (Abuse) करण्यात आली.

वाद विकोपाला; कानाखाली मारल्याने घेतला जीव

पाहता पाहता ते भांडण वाढले. जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली. त्यामुळे मन्नू हा प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने जयेशला हाता-बुक्क्यांनी (Fists) छातीत (Chest) आणि पोटावर (Stomach) मारहाण केली. एवढेच नव्हे तर क्रिकेटच्या लाकडी बॅटने (Wooden Cricket Bat) जयेशच्या चेहऱ्यावर (Face) आणि पाठीवर (Back) प्रहार केले. (Navi Mumbai)

उपचारादरम्यान मृत्यू; आरोपीला अटक

या मारहाणीमुळे जयेश हा गंभीर जखमी (Seriously Injured) झाला. त्याला उपचारासाठी (Treatment) तातडीने एमजीएम हॉस्पिटल (MGM Hospital) येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्येच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यावर खारघर पोलीस तेथे दाखल झाले. आरोपी मन्नूविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (Navi Mumbai)

Title: Friend Kills Friend Over Chicken Party Dispute In Kharghar Navi Mumbai

 

Join WhatsApp Group

Join Now