जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; धक्कादायक कारण आलं समोर

On: July 18, 2025 2:02 PM
Jitendra Awhad FIR
---Advertisement---

Jitendra Awhad FIR | विधानभवनातील वादग्रस्त घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad FIR) यांच्यावर अखेर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. ही कारवाई मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, यामागे विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतल्याचेही समजते.

कालच्या दिवशी विधानभवनात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात झालेल्या वादानंतर हे नाट्य निर्माण झालं. नितीन देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, त्याला जीपमधून नेत असताना आव्हाड यांनी जीपसमोर झोपून पोलिसांची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झालं आहे.

विधानभवनातील झटापटीनंतर मोठी राजकीय प्रतिक्रिया :

विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या घटनेत नितीन देशमुख (Nitin Deshmukh)  याला गंभीर मारहाण झाली होती. त्याचा शर्ट फाटला होता. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनातही आमदार सुरक्षित नाहीत, असा आरोप केला होता. याच घटनेचा राग पोलिसांनी नितीन देशमुख याला अटक करत व्यक्त केला, असा आरोप आव्हाड यांनी केला.

या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख याला जेव्हा पोलिस घेऊन चालले होते, त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस वाहन अडवून आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्यावर थेट भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Jitendra Awhad FIR | वडेट्टीवार यांचा सरकारवर स्फोटक आरोप :

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, “हे सरकार सत्तेच्या मस्तीत वागत आहे. मकोकाचा आरोपी विधानभवनात मोकळा फिरतो, पण आमदारावर गुन्हा दाखल होतो!” (Jitendra Awhad FIR) 

वडेट्टीवार म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की, गोपीचंद पडळकर यांनी इशारा करुन नितीन देशमुख यांना मारण्यास सांगितलं. त्यामुळे जाणीवपूर्वक हा हल्ला झाला आणि नंतर गुन्हाही आमच्यावरच दाखल केला जातो, ही फार मोठी शोकांतिका आहे.”

News Title: FIR Filed Against Jitendra Awhad for Obstructing Police Duty at Maharashtra Legislature

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now