Farmer Suicide | राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. अनेकांचं लक्ष हे लोकसभा निवडणुकीकडे लागलं आहे. अनेकजण आपल्या पक्षाचा, आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. मात्र शेतकऱ्याने कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत अनेकादा सरकारला साद घातली. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. कांदा निर्यातीबाबत अद्यापही सरकार काहीही करू शकलं नाही. भाजपवर लोक खूश नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात शेतकरी भाजपवर संतापून आहे. (Farmer Suicide)
निवडणुकीच्या तोंडावर 188 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
दिल्लीचं आंदोलन तसेच राज्यातील कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याबाबतची सरकारकडे केलेली मागणी. या महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा हिरमोड केला आहे. याचमुळे आता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तब्बल 188 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्याचं पाहायला मिळालं आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या 61 दिवसांत तब्बल 66 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. (Farmer Suicide)
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ नापिकी, सावकारांसह बँकांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलांची लग्न, आजारपण यासारख्या अन्य आजारामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात मार्च महिन्यात तब्बल 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हाप्रशासन हे निवडणुकीच्या तयारीत होते यामुळे जागाचा पोशिंदा बळाराजाकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं.
अमरावतीत 2001 ते 2024 वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात माध्यमाने सांगितलेल्या माहितीनुसार 2001 ते 2024 वर्षात तब्बल 5294 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेण्याचं काम केलं आहे.
पुणे जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. डाळिंब, ऊस, कांदा सारख्या पिकांना फटका बसल्याने लवकरात तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.
News Title – Farmer Suicide In Loksabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
देशभरात गाजलेल्या महादेव बेटिंग अॅपचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत; खळबळजनक माहिती समोर
चाणक्यांचे ‘हे’ 3 बहुमूल्य नियम पाळा; जीवनात यशाचं सर्वोच्च शिखर गाठाल
मोदींना जिरेटोप घातल्याने उफळला वाद; प्रफुल पटेलांची पोस्ट चर्चेत मात्र माफी नाहीच
“राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, एका इव्हेंटचे किती पैसे घेतात?”
सिद्धू मूसेवालाच्या आईने 59 वा वाढदिवस केला साजरा, पोस्ट व्हायरल






