उद्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार? कृषिमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

On: July 21, 2026 1:54 PM
Farmer Loan Waiver
---Advertisement---

Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी पात्र शेतकऱ्यांची प्राथमिक यादी उद्या जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करत 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचवेळी बोगस बियाणे प्रकरणातील कारवाईबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

30 जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा होण्याचा दावा :

शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, उद्याच कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची प्राथमिक यादी जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जयंतीचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. आयकर विभागाकडील आवश्यक माहिती सरकारला प्राप्त झाली असून तांत्रिक अडचणीही दूर झाल्यामुळे प्रक्रियेत कोणताही अडथळा राहिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भरणे यांनी पुढे सांगितले की, सरकारचे उद्दिष्ट 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेबाबत सकारात्मक संकेत दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

Farmer Loan Waiver | बोगस बियाणे प्रकरणात मोठी कारवाई :

कृषीमंत्र्यांनी खरीप 2025 हंगामातील सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची माहितीही दिली. राज्यात सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र 47.12 लाख हेक्टर असून 19 जुलैपर्यंत 41.64 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. या हंगामासाठी 13.125 लाख क्विंटल बियाण्यांची गरज असताना 18.57 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करण्यात आला होता. मात्र उगवण क्षमतेबाबत एकूण 11,584 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील बहुतांश तक्रारी अकोला (Akola), अमरावती (Amravati), बुलढाणा (Buldhana) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांमधून आल्या आहेत.

या तक्रारींपैकी 8,192 प्रकरणांची तालुकास्तरीय समित्यांनी तपासणी केली आहे. तपासणीसाठी 7,422 बियाण्यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 763 नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीत निकृष्ट किंवा अमान्य आढळले. या निष्कर्षानंतर 81 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

News Title: Farm Loan Waiver List Tomorrow

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now