प्रसिद्ध अभिनेत्रीचं क्लोथलेस फोटोशूट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच लोक संतापले

On: July 21, 2025 4:07 PM
Khushi Mukharjee
---Advertisement---

Khushi Mukherjee | प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते आणि त्याचे कारण तिचे कपडेच असतात. आता पुन्हा एकदा खुशी मुखर्जी तिच्या ‘क्लोथलेस’ फोटोशूटमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

अभिनेत्रीचं क्लोथलेस फोटोशूट

खुशी मुखर्जीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे, ज्यामध्ये तिच्या अंगावर कपडे दिसत नाहीत, असे म्हटले जात आहे. तिच्या या ‘क्लोथलेस’ फोटोशूटने चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोशूटच्या कॅप्शनमध्ये तिने ‘हॉटनेस आणि बोल्ड फोटोशूट’ असे लिहिले आहे. फोटोशूटमध्ये ती कपड्यांशिवाय दिसत असून, तिने स्वतःवर काळ्या रंगाची मखमली शाल किंवा फर ब्लँकेट लपेटली आहे.

या लूकसोबत तिने हाय हील्स घातले आहेत. तिने मिडल पार्टेड हेअरस्टाईल केली असून, स्मोकी आय मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे. खुशीचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये ती तिच्या गळ्याखाली असलेला टॅटू देखील फ्लॉन्ट करताना दिसतेय, ज्यामुळे तिच्या बोल्डनेसवर अधिक भर दिला गेला आहे.

अभिनेत्रीला ट्रोलर्सने सुनावलं

खुशीचं हे फोटोशूट खूपच बोल्ड असल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अनेक लोक तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने तर असेही लिहिले आहे की, “ये हुई न बात… आता तू तुझे खरे रंग दाखवलेस. आई आणि बाबा काही बोलत नाहीत का गं तुला?” यातून ट्रोलर्सची तीव्र प्रतिक्रिया दिसून येते.

खुशी मुखर्जी नेहमीच पॅपाराझींना क्लासी पोझ देताना स्पॉट होत असते. एकदा खुशी फारच बोल्ड कपड्यांमध्ये दिसली होती आणि तिचा त्या ड्रेसमधला लूक खूपच व्हायरल झालेला. त्यावेळी खुशीला खूप ट्रोलही करण्यात आलेलं. खुशीने एका मुलाखतीत ट्रोलिंगवर बोलताना सांगितले होते की, पॅपाराझी फोटो क्लिक करतात आणि नाव माझं बदनाम होतं.

खुशीचं हे वाक्य ऐकून पॅपाराझी भडकलेले होते. ते खुशीला म्हणाले की, “जर तुम्हाला एवढाच त्रास आहे, तर तुम्ही असे कपडे घालताच कशाला?” पॅपाराझींसोबतच नेटकऱ्यांनीही खुशीला फैलावर घेतले होते, ज्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर खुशीने पॅपाराझींची हात जोडून माफी मागितली होती.

News Title- Famous Model Khushi Mukherjee’s ‘Clotheless’ Photoshoot Goes Viral

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now