पुण्यात भोंदूगिरीचा कळस! महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार; मांजरी हादरली

On: March 28, 2026 3:15 PM
Pune crime
---Advertisement---

Pune crime | पुणे (Pune) शहरातील मांजरी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच मांजरी पोलीस ठाण्याने त्वरीत कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

फेसबुक ओळखीतून वाढले संबंध :

या प्रकरणाचा उगम मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय (Mira-Bhayandar Vasai Virar Police Commissionerate) अंतर्गत असलेल्या माणिकपूर पोलीस स्टेशन (Manikpur Police Station) येथे झाला. तेथून २७ तारखेला झिरो क्रमांकाने एफआयआर मांजरी पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मांजरी पोलीस स्टेशन (Manjari Police Station) येथे त्यावर नियमित गुन्हा नोंद करण्यात आला.

तक्रारदार महिलेच्या निवेदनानुसार, आरोपीने तिच्या संमतीशिवाय तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) कलम ६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत असे आढळले की आरोपी धार्मिक विधी आणि पूजा-अर्चा करणारा असून पीडित महिला त्याची अनुयायी होती. दोघांची पहिली ओळख ऑक्टोबर २०२३ मध्ये फेसबुक (Facebook) या सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप आणि फोन कॉलसह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्यातील संपर्क सातत्याने वाढत गेला. (Pune Fake godman case)

Pune crime | लॉजमध्ये भेट, पोलिसांकडून पुरावे गोळा :

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी माणिकपूरहून मांजरी येथे आला होता. या दरम्यान शहरातील एका लॉजमध्ये दोघांची भेट झाली आणि त्याच ठिकाणी संबंध प्रस्थापित झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपासात पीडित महिला देखील नंतर माणिकपूर येथे गेल्याचे समोर आले असून या दोन्ही ठिकाणांशी संबंधित पुरावे पोलिसांकडून गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, मांजरी पोलिसांनी (Manjari police) घटनेची माहिती मिळताच आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच त्याला ताब्यात घेतले. सध्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार या गुन्ह्यात आरोपी एकटाच सहभागी असल्याचे दिसून आले असून इतर कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळलेला नाही. तसेच पोलिसांच्या माहितीनुसार या व्यक्तीवर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंदलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

News Title: Fake Godman Assault Case Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now