कुंभमेळ्यातील गर्दीवर ‘फेस रेकग्निशन’द्वारे नजर, अनेक गुन्हेगार अटकेत

On: February 20, 2025 10:02 AM
Face Recognition Helps Nab Criminals at Kumbh Mela 2025 
---Advertisement---

Kumbh Mela 2025 | प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळाव्यात येणाऱ्या भाविकांची संख्या ५२ कोटींहून अधिक झाली आहे. या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. विशेषतः चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी ‘एआय’ (AI) आणि ‘फेस रेकग्निशन’ (face recognition) कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. (Kumbh Mela 2025)

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची भूमिका

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये (Integrated Command & Control Center)पोलिसांचा मोठा गट विविध कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण घाट परिसर तसेच शहरातील गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले. आयपीएस (IPS) अधिकारी अमित कुमार (Amit Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जाते.

आवश्यकता भासल्यास, वाहतूक वळवण्याचे निर्देश देखील याच केंद्रातून दिले जातात. गर्दीवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. गेल्या महिन्याभरात, प्रयागराज पोलिसांनी कुंभमेळ्यातून २५ हून अधिक कुख्यात आणि पाहिजे असलेल्या गुंडांना ताब्यात घेतले आहे, ते याच ‘एफआरएस’ कॅमेऱ्यांच्या मदतीने.

गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष तंत्रज्ञान

पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव, पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचे फोटो कॅमेऱ्यांशी संबंधित सॉफ्टवेअरमध्ये अगोदरच अपलोड केलेले आहेत. त्यामुळे, कॅमेऱ्याच्या कक्षेत येताच या गुन्हेगारांची ओळख पटते आणि त्यांना पकडणे सोपे होते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, बहुसंख्य लोक पायी प्रवास करतात आणि अनेकांची छायाचित्रे किंवा माहिती कोणत्याही डेटाबेसमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे, या फेस रेकग्निशन कॅमेऱ्यांचा मुख्य उद्देश असामाजिक तत्त्वे आणि कुख्यात गुन्हेगारांचा शोध घेणे हा आहे. ५६ कोटी हून अधिक भाविक आले, कॅमेऱ्यांच्या डेटा सॉफ्टवेअरमध्ये टाकून अल्गोरिदमच्या आधारावर ही आकडेवारी जारी करण्यात येत आहे. यासाठी एका कंपनीची मदत घेण्यात आली आहे. (Kumbh Mela 2025)

Title : Face Recognition Helps Nab Criminals at Kumbh Mela 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now