उपसरपंच बर्गेंच्या मृत्यूबाबत नर्तिका पूजा गायकवाडचा खळबळजनक खुलासा!

On: September 12, 2025 6:55 PM
Govind Barge Death Case
---Advertisement---

Pooja Gaikwad | बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) येथील आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. बर्गे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर, वैराग पोलिसांनी (Vairag Police) नर्तिका पूजा गायकवाडला (Pooja Gaikwad) अटक केली आहे. पूजाने ब्लॅकमेल करून बर्गे यांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पूजा गायकवाडची कबुली-

मंगळवारी, गोविंद बर्गे यांचा मृतदेह बार्शी तालुक्यातील सासुरे गावाच्या शिवारात त्यांच्याच कारमध्ये आढळून आला होता. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याचं प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र, नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला (Pooja Gaikwad) अटक केली. चौकशीदरम्यान, पूजाने विवाहित असलेल्या गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे.

बर्गे यांच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, धाराशिव (Dharashiv) येथील एका कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या पूजाच्या प्रेमात पडलेल्या गोविंद यांनी तिच्यावर लाखो रुपये खर्च केले होते. मात्र, तिने गेवराई येथील आलिशान घर नावावर करून देण्यासाठी बर्गे यांच्याकडे तगादा लावला होता. “घर नावावर केले नाही, तर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी ती देत होती. या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच गोविंद यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरली-

दरम्यान, बर्गे यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणात हत्येचा संशयही व्यक्त केला आहे. “गोविंदच्या कारचा दरवाजा बाहेरून लॉक होता आणि गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरली होती, हे कसे शक्य आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, पोलीस आता आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि घातपात या दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

News Title – Ex-Sarpanch’s death case Dancer Arrested for Blackmail

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now