UPI आणि ATM वरून PF चे पैसे कधीपासून काढता येणार?, मोठी अपडेट समोर

On: March 26, 2025 7:34 AM
EPFO ATM Facility starts Soon
---Advertisement---

EPFO ATM Facility | ईपीएफओने कोट्यवधी खातेदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. लवकरच कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातून UPI आणि ATM कार्डच्या माध्यमातून रक्कम काढू शकतील. ही सुविधा केव्हा सुरू होणार आणि कोणते बदल लागू होणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. (EPFO ATM Facility)

UPI आणि ATM वरून पीएफ पैसे कधी काढता येणार?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच खातेदारांसाठी एक महत्त्वाची सुविधा लागू करणार आहे. याअंतर्गत खातेदारांना आपल्या पीएफ खात्यातून थेट UPI किंवा ATM कार्ड वापरून रक्कम काढता येणार आहे. ही नवी पद्धत सुरू झाल्यानंतर कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुमित डावरा (Sumit Devra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा मे किंवा जून 2025 पासून लागू केली जाणार आहे.

यासाठी मंत्रालयाने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या शिफारशींना मान्यता दिली आहे. त्यामुळे UPI द्वारे पैसे काढणे किंवा जमा करणे शक्य होईल. तसेच, याच माध्यमातून पीएफ खात्यातील उपलब्ध शिल्लक देखील तपासता येणार आहे. हे एक मोठं डिजिटल पाऊल असून, ईपीएफओनं ही सेवा सुरू करून खातेदारांना अधिक सुलभ आणि जलद सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रोसेसिंगमध्ये मोठी सुधारणा

सुमित डावरा यांच्या माहितीनुसार, पीएफचे पैसे तातडीने काढण्याची गरज भासल्यास सदस्य 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकतात. यासाठी कोणतीही क्लिष्ट प्रक्रिया किंवा प्रतिक्षा न करता ऑनलाइन प्रणालीच्या सहाय्याने व्यवहार पूर्ण करता येईल. (EPFO ATM Facility)

ईपीएफओने 120 हून अधिक डेटाबेसला एकत्र करून डिजिटल प्रोसेसिंगमध्ये मोठी सुधारणा केली आहे. यामुळे पूर्वी अनेक दिवस लागणारी क्लेम प्रक्रिया आता केवळ 3 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. याशिवाय, 95% पेक्षा अधिक क्लेम्स पूर्णतः ऑटोमेटेड करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे खातेदार कोणत्याही बँक शाखेतूनही पेन्शनची रक्कम काढू शकतील.

Title : EPFO ATM Facility starts Soon

 

Join WhatsApp Group

Join Now