PF Money Withdraw l खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती सुधारण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची स्थापना करण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती निधी उभारण्यासाठी, दरमहा कंपनी आणि कर्मचारी पीएफमध्ये समान रक्कम जमा करतात. यावर सरकार वार्षिक व्याजही देते. सध्या पीएफवर 8.15 टक्के व्याजदर आहे.
कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता? :
ईपीएफमध्ये जमा केलेली ही रक्कम निवृत्ती निधी आहे, परंतु गरज पडल्यास ती काढता येते. प्रत्येक गरजेसाठी निधी काढण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत. तुम्हीही पीएफमधून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता?
हॉस्पिटल इमर्जन्सी : आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. PF खातेधारकाला उपचारासाठी आपत्कालीन पैशांची गरज असेल तर कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातून उपचारासाठी एकावेळी तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकतो.
PF Money Withdraw l या कामासाठी तुम्ही PF मधून पैसे काढू शकता :
घर खरेदी : अनेकदा लोकांना घर घेण्यासाठी पैशांची अत्यंत जास्त गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या तुमच्या PF खात्यातून पैसे देखील काढू शकता. घर खरेदीकरायचे असेल तर तुम्ही एकूण रकमेच्या तब्बल 90 टक्के रक्कम PF खात्यातून काढू शकता.
घर नूतनीकरण : जर तुम्हाला घर खरेदी आणि जमीन खरेदी करण्यासोबतच तुम्ही तुमच्या फ्लॅट किंवा घराचे नूतनीकरण करायचे असेल, तर त्यासाठी कर्मचारी PF खात्यातून पैसे काढू शकता. तसेच जर नूतनीकरणासाठी तुम्ही तुमच्या मासिक पगाराच्या तब्बल 12 पट रक्कम देखील काढू शकता.
लग्नासाठी : कित्येकदा लोकांना लग्नासाठी पैशांची गरज असते. अशा परिस्थितीत कोणताही कर्मचारी खात्यातून लग्नासाठी योगदानाच्या 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम व्याजासह काढू शकतो. मात्र यासाठी सात वर्षांची सेवा केलेली असावी लागते.
News Title – EPF Withdrawal Rules 2024
महत्त्वाच्या बातम्या
गरोदरपणात महिलांचा आहार कसा असावा, जाणून घ्या ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे
घराचं स्वप्न महागलं; ‘या’ प्रमुख शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ
‘तारक मेहता…’ मधील सोढी अखेर घरी परतला; एवढ्या दिवस कुठे होता?, धक्कादायक खुलासा समोर
विराट कोहलीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर; ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल
जबरदस्त आणि आकर्षक टीव्हीएस कंपनीची ब्लॅक एडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत






