Entertainment News | मनोरंजनसृष्टीत ‘कास्टिंग काऊच’ ही संकल्पना नवीन राहिलेली नाही. अनेक अभिनेत्रींनी या प्रकाराला सामोरं गेल्याचं उघडपणे सांगितलं आहे. मराठी, हिंदी आणि दक्षिण चित्रपटांमध्ये (Entertainment News) काम केलेल्या अभिनेत्री संयमी खेर (Saiyami Kher) हिनेसुद्धा अशाच एका धक्कादायक अनुभवाची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, तिला ‘कॉम्प्रमाईज’ करण्यास सांगणारी एक महिला एजंट होती!
काय आहे प्रकरण?
‘बॉलिवूड बबल’ (Bollywood Bubble) ला दिलेल्या एका मुलाखतीत संयमी खेर म्हणाली, “तेव्हा मी फक्त १९ वर्षांची होते. एका तेलुगू सिनेमासाठी एका महिला एजंटचा कॉल आला. तिने थेट सांगितलं की काम हवं असेल तर ‘कॉम्प्रमाईज’ करावं लागेल. एका स्त्रीकडून अशा प्रकारचं बोलणं ऐकून मी हादरलेच. मी तिला स्पष्टपणे सांगितलं की मी अशी मुलगी नाही आणि मी कधीही माझ्या मूल्यांशी तडजोड करणार नाही.”
View this post on Instagram
संयमी पुढे म्हणाली, “सुदैवाने हिंदी सिनेसृष्टीत मला कधीही असं वागणूक मिळालं नाही. मला जेव्हा संधी मिळाल्या, त्या माझ्या कामाच्या जोरावर मिळाल्या. मी साऊथ इंडस्ट्रीत तीन चित्रपट केले, आणि नागार्जुन सरांसारख्या कलाकारासोबतही काम केलं. त्यामुळे हा अनुभव माझ्या करिअरमध्ये एकदाच आला.”
मराठीपासून हिंदीपर्यंतचा संयमीचा प्रवास
संयमी खेरने रितेश देशमुखसोबत (Entertainment News) ‘माऊली’ या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. याशिवाय ती ‘मिर्झ्या’, ‘घुमर’, ‘अग्नी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतही झळकली आहे. तिच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा झाली असून ती आजही अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये सक्रिय आहे.
संयमीच्या या अनुभवावरुन पुन्हा एकदा कास्टिंग काऊचच्या गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधलं जातं. महिला एजंटदेखील यात सहभागी असल्याचं तिच्या वक्तव्यामुळे अधोरेखित होतं.






