34 वर्षीय अभिनेत्याचा हृदयविकाराने मृत्यू, सिनेसृष्टित एकच खळबळ

On: May 12, 2025 1:24 PM
Pune Rain News
---Advertisement---

Entertainment News | मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता आणि विनोदी कलाकार राकेश पूजारी (Rakesh Poojary) याचे वयाच्या केवळ ३४व्या वर्षी निधन झाले आहे. एका जवळच्या मैत्रिणीच्या मेहंदी सोहळ्यासाठी गेलेल्या राकेशला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हृदयविकाराचा झटका-

११ मे रोजी राकेश आपल्या शहरातल्या मैत्रिणीच्या मेहंदी कार्यक्रमाला गेला होता. तिथे त्याने मित्रपरिवारासोबत डान्स करत आनंद साजरा केला. मात्र याच दरम्यान त्याची प्रकृती अचानक खालावली. ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतरही उपचार सुरू असताना १२ मे रोजी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

राकेशला याआधी कोणतीही आरोग्यविषयक तक्रार नव्हती, त्यामुळे त्याचं अचानक जाणं सगळ्यांनाच धक्का देणारं ठरलं. त्याच्या मृत्यूने चाहत्यांसह (Entertainment News) संपूर्ण कन्नड मनोरंजन विश्व शोकमग्न झालं आहे.

‘कॉमेडी खिलाडी’ मधून मिळाली ओळख-

राकेश पूजारी याला खरी ओळख ‘कॉमेडी खिलाडी’ या कन्नड विनोदी कार्यक्रमातून मिळाली होती. त्याच्या अनोख्या शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली होती. त्याच्या विनोदांनी अनेकांच्या (Entertainment News) चेहऱ्यावर हास्य फुलवलं होतं.

अभिनेता शिवराज केआर पीटने (Shivraj KR Pete) राकेशच्या निधनाची माहिती दिली आणि सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “ज्याने असंख्य चेहऱ्यावर हास्य फुलवलं, त्या आत्म्यास शांती लाभो,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. राकेशच्या पश्चात त्याची आई आणि लहान बहीण असा परिवार असून त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

News Title – entertainment news kannad actor passed by heart attack

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now