सेक्स… पार्ट्या… साप… प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवला अटक होणार?

On: November 3, 2023 3:22 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवला केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष विकल्याचा आरोप आहे. भाजप खासदार मनेका गांधी यांच्या एनजीओने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

मनेका गांधी यांनी स्वतः पत्रकारांना याबाबत माहिती दिली आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये साप तसेच सापाचं विष विकल्याचा आरोप त्यांनी एल्विश यादववर केला आहे. आम्ही त्याला ट्रॅप केलं. त्याच्याकडे साप तसेच सापाच्या विषाची मागणी केली, त्यानं पहिल्यांदा पडताळून पाहिलं आणि त्यानंतर ते आम्हाला विकलं, असा आरोप मनेका गांधी यांनी केला आहे.

मनेका गांधी यांच्या दाव्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, मात्र लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की पोलिसांच्या उपस्थितीत हा ट्रॅप लावल्याची माहिती स्वतः मनेका गांधी यांनी दिली आहे.

एल्विश यादवला अटक होणार?

मनेका गांधी यांच्या एनजीओनं लावलेल्या ट्रॅपमध्ये सापाचं विष विकत घेण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये सापाचं विष विकण्यासाठी आलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता पुराव्यांच्या आधारे एल्विश यादवला या प्रकरणी अटक होऊ शकते. मनेका गांधी यांनी तर एल्विशला तात्काळ अटक करण्याची मागणी केलीय तसेच तो सध्या फरार असल्याचा दावा देखील केला आहे.

दरम्यान, नोएडातील एका पार्टीत विदेशी तरुणी बोलवण्यात आल्या होत्या, या पार्टीत सापाच्या विषाची नशा करुन विदेशी तरुणींसोबत रंगीत खेळ रंगल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे. तपासातून अधिक धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, असा दावा केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ठाकरे गटाला मोठा झटका; बडा नेता ईडीच्या जाळ्यात अडकला

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात ‘या’ पक्षातील नेत्याचा हात?

“आदित्य ठाकरेंना अटक होणार?”

मराठा समाजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

“बाजारात चार आणे आणि राजकारणात राणे यांना आता कवडीची किंमत नाही”

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now