5 राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलं! मतदानाच्या तारखा जाहीर, कुठे कधी मतदान होणार?

On: March 15, 2026 5:15 PM
Election Date Announcement
---Advertisement---

Election Date Announcement | भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज, 15 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता ऐतिहासिक घोषणा करत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. 2021 च्या तुलनेत यावेळी अत्यंत कमी टप्प्यांत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यावर आयोगाने भर दिला आहे.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्वाचे तपशील

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केवळ बंगालमध्येच एप्रिल महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला असे दोन टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. दुसरीकडे, उर्वरित सर्व ठिकाणी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये 23 एप्रिलला तमिळनाडूतील मतदार आपला हक्क बजावतील, तर 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका पार पडतील.

गेल्या 2021 च्या विधानसभा रणधुमाळीत तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या असल्या तरी, आसाममध्ये तीन तर बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांत ही प्रक्रिया राबवावी लागली होती. मात्र, यंदा राजकीय हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, बंगालसारख्या संवेदनशील राज्यात मतदानाचे टप्पे कमी करून केंद्रीय सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या पाचही राज्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारांची मुदत आगामी मे आणि जून 2026 मध्ये संपुष्टात येत आहे. आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ 7 मे रोजी, तर तमिळनाडूचा 10 मे रोजी पूर्ण होत आहे. याव्यतिरिक्त आसामची मुदत 20 मे ला आणि केरळ विधानसभेची मुदत 23 मे रोजी संपणार आहे.

दरम्यान, संभाव्य राजकीय तणाव आणि हिंसाचार टाळण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या जाणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगाने दिली. या पाचही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे ते जून 2026 दरम्यान संपत असल्याने निवडणूक आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आता या राज्यांमध्ये राजकीय प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे

Join WhatsApp Group

Join Now