महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार; एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार?

On: October 22, 2024 6:24 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओक्केमध्ये आहे” हा आमदार शहाजीबापू पाटील यांचा डायलॉग राज्यात प्रचंड गाजला होता. मात्र त्यावेळी या घडामोडींचं केंद्रबिंदू गुवाहाटी येथून हालत होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra l एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार :

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री गुवाहाटीला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. करण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा देखील करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री आसाम येथील गुवाहाटीला रवाना होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रात्री बारा वाजता गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा होणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून कामाख्या देवी मंदिर व्यवस्थापनाला देखील कळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

News Title : eknath shinde will be go guwahati 

महत्वाच्या बातम्या –

भाजपला विदर्भात मोठा धक्का! बडा नेता राष्ट्रवादीत

लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर; कोणी दिली ऑफर?

शरद पवारांचा शिंदे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने तुतारी फुंकली

पुण्यात राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र केसरीच्या घरावर ईडीची धाड!

भाजपच्या कट्टर नेत्यानी साथ सोडली! शिवसेनेत प्रवेश करणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now