गद्दार शब्द ऐकताच एकनाथ शिंदे भडकले, रागात गाडीतून उतरले अन्…

On: November 12, 2024 4:31 PM
Eknath Shinde
---Advertisement---

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापू लागला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या चांदिवलीत प्रचारासाठी गेले होते. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या कार्यालयाबाहेरुन एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता.

एकनाथ शिंदे भडकले

ताफा जात असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘गद्दार, गद्दार’च्या घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री चांगलेच संतापले. त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढलेला पाहायला मिळाला.

मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतोष कटके यानी काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या.

Eknath Shinde यांनी विचारला जाब

‘ऐसा सिखाते हे क्या आप लोग?’, अशा शब्दांत एकनाथ शिंदे  विचारला. यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

संतोष कटके या शिवसैनिकाचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटके यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आज संतोष कटके हे सकाळीच मातोश्रीवर गेले होते. यावेळी संतोष काटके यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांबद्दल व नवऱ्याबद्दल व्यक्त केली खंत!

शरद पवारांचा सदाभाऊ खोतांना मोठा धक्का!

ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धक्का, कल्याणमधील बड्या नेत्याने सोडली साथ

शिंदे गटाचे 8 आमदार, एक मंत्री ठाकरेंकडे परत येणार?

कॉँग्रेसकडून सर्वाधिक मुस्लिम उमेदवार मैदानात, भाजपने किती जणांना दिली संधी?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now