कॉँग्रेसकडून सर्वाधिक मुस्लिम उमेदवार मैदानात, भाजपने किती जणांना दिली संधी?

On: November 12, 2024 1:19 PM
Maharashtra Budget Session
---Advertisement---

Vidhan Sabha Election 2024 | महाराष्ट्रात 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडते आहे. येत्या 20 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांची संख्या फारच कमी असल्याचं आकड्यातून समोर आलं आहे. 288 जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर एकही मुस्लिम उमेदवार नसल्याचं समोर आलंय. (Vidhan Sabha Election 2024)

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. या दोन्ही आघाडीत कॉँग्रेसने सर्वाधिक 9 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील 150 हून अधिक विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे एकही मुस्लिम उमेदवार नाही.

कॉँग्रेसकडून सर्वाधिक 9 मुस्लिम उमेदवार मैदानात

राज्यात निवडणूक रिंगणात असलेल्या 4 हजार 136 उमेदवारांपैकी केवळ 420 मुस्लीम उमेदवार आहेत. विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसने 9 मुस्लीम उमेदवारांना तिकिट देऊन उमेदवारी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 मुस्लिम उमेदवारांना निवडणूक रिंगणात उभे केले आहे. (Vidhan Sabha Election 2024)

असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम या पक्षाने सर्वाधिक 16 उमेदवार दिले आहेत. 420 मुस्लिम उमेदवारांपैकी 218 मुस्लिम उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मालेगावमध्ये सर्व 13 उमेदवार मुस्लिम आहेत. औरंगाबाद पूर्वमधून एकूण 29 उमेदवारांपैकी 17 उमेदवार मुस्लिम आहेत. यासोबतच 288 जागांपैकी 270 जागांवर एकही मुस्लिम महिला उमेदवार नाही.

राज्यात महायुती vs महाविकास आघाडी लढत

या विधानसभेत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट), भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) समावेश आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना , ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहेत.  (Vidhan Sabha Election 2024)

News Title – Vidhan Sabha Election 2024 Muslim candidates

महत्त्वाच्या बातम्या-

थंडीचा कडाका वाढला असतानाच राज्यावर पावसाचंही सावट, पुढील 3 दिवस..

हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?

“शिंदेंच्या सर्व उमेदवारांना 25 कोटी…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अजितदादांची चिंता वाढली, भाजपच्या बड्या नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा

गुड न्यूज! सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती

Join WhatsApp Group

Join Now