ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात?

On: July 10, 2026 11:55 AM
Eknath Shinde Attack on Uddhav Thackeray 
---Advertisement---

Eknath Shinde Operation Tiger | राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे (Operation Tiger) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती अद्याप थांबलेली नाही. खासदार आणि आमदार सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर आता शिंदे गटाने नाशिकमध्ये ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) आणखी एक मोठा सुरुंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे तब्बल १० ते १२ नगरसेवक सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असून, त्यांच्यात गुप्त बैठका झाल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिकमध्ये नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न; ग्रामीण भागातही खिंडार?

नाशिकमधील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, ठाकरे गटाच्या या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दाखवण्यात आले आहे.

नेत्यांचा दावा: शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी या घडामोडींना दुजोरा देत सांगितले की, हा कोणताही दबावाचा भाग नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे आकर्षण आहे. विधान परिषद निवडणुकीच्या वेळेपासूनच मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्या संपर्कात अनेक पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत.

आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रायगडमध्ये अजित पवार गटाची चाल; शिंदेंच्या शिवसेनेला रोह्यात धक्का

दुसरीकडे, महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळत असून रायगड जिल्ह्यात (Raigad) राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

शिंदे सेनेचे माजी रोहा तालुकाप्रमुख आणि उत्तर रायगडचे उपजिल्हाध्यक्ष मनोज शिंदे (Manoj Shinde) हे आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

मनोज शिंदे यांच्यावर यापूर्वी नगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या या प्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

मुंबई मनपात भाजपला लॉटरी; ‘एमआयएम’च्या नगरसेविका अपात्र

मुंबई महानगरपालिकेतून (BMC) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाला मोठा झटका बसला आहे.

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३८ मधील एमआयएमच्या नगरसेविका रोशन इरफान शेख (Roshan Irfan Sheikh) यांचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate) अखेर परभणी येथील जात पडताळणी समितीने अवैध ठरवून रद्द केले आहे. तपासणीत त्यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने रोशन शेख यांचे नगरसेवकपद तातडीने रद्द करण्यात आले आहे. या कायदेशीर निर्णयामुळे या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवाराला थेट नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे. मुंबई मनपाच्या इतिहासात जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून भाजपला तिसऱ्यांदा अशी लॉटरी लागली आहे.

News Title: Eknath Shinde Operation Tiger Thackerays 12 corporators will split

Join WhatsApp Group

Join Now