एकनाथ शिंदेंचा भर सभेत मोठा धमाका! बंडखोर खासदारांबाबत केलं खळबळजनक वक्तव्य

On: June 19, 2026 8:50 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को सेंटर (NESCO Centre) येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम झाला, तर षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांदरम्यान शिंदे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

वर्धापन दिनात शिंदेंचे सूचक संकेत :

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर उपस्थित नेते, मंत्री, उपनेते, खासदार आणि आमदार हे पक्षाची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सभागृहात उपस्थित शिवसैनिक हीच आपली खरी संपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणात त्यांनी अनेकांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या असल्याचा उल्लेख केला. आपण काय बोलणार, व्यासपीठावर कोण उपस्थित राहणार आणि पुढे काय घडणार, याबाबत उत्सुकता असल्याचे सांगत त्यांनी, “आज हा वाघ तुमच्यासमोर उभा आहे,” असे वक्तव्य केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde | ‘ट्रेलर’नंतर पुढे काय? :

पुढे बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. “काहीजण सातत्याने टीका करत आहेत. कुत्रे झुंडीने भुंकतात, पण वाघ एकटाच येतो. वाघ शिकार करतो,” असे ते म्हणाले. त्यांनी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या विचारांवर चालणारी संघटना असल्याचे अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी “हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे सूचक विधान करत भविष्यात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले. ठाकरे गटातील काही खासदारांच्या संभाव्य प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हक्कांसाठी झाला आहे. हिंदुत्वाचा आवाज, मराठी अस्मितेचा निर्धार, देशविरोधी शक्तींविरोधातील भूमिका, महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण हीच शिवसेनेची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

News title : Eknath Shinde Hints At Political Move

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now