महायुतीचा मोठा डाव! आदित्य ठाकरें विरुद्ध उतरवला ‘हा’ बडा नेता

On: October 25, 2024 6:06 PM
Aditya Thackeray
---Advertisement---

Aditya Thackeray l विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष बड्या नेत्यांना उमेदवारी देत आहेत. अशातच आता वरळी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मोठा डाव टाकला आहे. कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार असलेले आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवले आहे.

आदित्य ठाकरें समोर मोठं आव्हान :

मिलिंद देवरा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, त्यांना आमदारकीसाठी वरळी विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्यात आलं आहे. अशातच आता वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने देखील दिग्गज नेते संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. अशातच आता वरळीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमदेवार मैदानात उतरवला आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. कारण या विधानसभा मतदार संघात तीनही दिग्गज नेते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. याशिवाय वरळीकरांना अनेक वर्ष न्याय मिळावा अशी प्रतीक्षा होती. मात्र आता आम्ही आमचे व्हिजन देखील जनतेपुढे मांडणार अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी केली आहे.

Aditya Thackeray l लवकरच पुढील धोरण जाहीर करणार :

यासंदर्भात राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा लढवून मी वरळीकरांना न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवला आहे. त्यामुळे लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत आमचं पुढील धोरण देखील जाहीर करू असे म्हणत राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचं जाहीर केलं आहे.

त्यामुळे आता आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे व शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांचे मोठे आव्हान असणार आहे.

News Title : Eknath Shinde gave ticket milind deora for worli vidhansabha

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळवला, ‘या’ नेत्याचं टीकास्त्र

पुण्यातील ‘या’ भागात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं!

दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबररोजी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त व पूजा विधी

एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक; ‘या’ नेत्याचा मोठा आरोप

अजितदादांची जबरदस्त खेळी, मविआतील ‘या’ बड्या नेत्यांविरोधात टाकला मोठा डाव

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now