“एकनाथ शिंदे कोण आहेस तू?”; प्रियंका चतुर्वेदी भरसभेत भडकल्या

On: May 9, 2024 3:21 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | मुंबईतील एका सभेत ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोण गद्दार?, असा सवाल करत केलाय. यामुळे दोन्ही गटांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही गटाकडून खालच्या पातळीची टीका केली जात आहे.

“एकनाथ शिंदे कोण आहेस तू?”

महाविकास आघाडीचे उमेदवार दीना पाटील यांच्यासाठी मुंबईमध्ये सभा घेण्यात आली होती. त्यासभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या. “एकनाथ शिंदे कोण आहेस तु? कोण आहेस तु? म्हणत मोठ्याने ओरडत होत्या. तेव्हा खाली उपस्थित गद्दार गद्दार म्हणाले. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे, गद्दार आहे आणि गद्दार राहणार, असं त्या म्हणाल्या.

अमिताभ बच्चन यांच्या दिवार सिनेमाचा दाखला देत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. दिवार सिनेमात अमिताभ बच्चन आपला हात दाखवतात. त्यावर लिहिलेलं असतं की मेरा बाप चोर है. तसं श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं आहे की मेरा बाप गद्दार है, प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला, शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिलंय.

“तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत…”

“प्रियंका चतुर्वेदी यांनी डाओसच्या गुलाबी थंडीत काय केलं हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला बोलायला लावू नका. तुम्ही खासदार कशा झाल्या हे आम्हाला माहिती आहे,” असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी भाषेचा स्तर घालवत प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, एका सभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती, ते म्हणाले की, कोण आदित्य ठाकरे? असा सवाल त्यांनी केलेला. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत शिंदेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय. (Eknath Shinde)

सुषमा अंधारे म्हणाल्या की, तेच आदित्य ठाकरे ज्यांना श्रीकांत शिंदे नाश्ता द्यायचे, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.

News Title – Eknath Shinde And Priyanka Chaturvedi News Update

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी महिन्याला 1000 रुपये गुंतवा; लग्नाचा खर्च आरामात निघेल

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचं निधन; संपूर्ण बॉलीवुडमध्ये शोककळा

“केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”

नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?

Join WhatsApp Group

Join Now