‘संमतीने सगळं झालं असेल…’; एकनाथ खडसेंचा जावयाबाबत मोठा दावा

On: August 9, 2025 4:46 PM
Eknath Khadse
---Advertisement---

Eknath Shinde | पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केल्यानंतर, आता एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या जावयाबद्दल थेट मोठे विधान केले आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण मिळाले आहे.

एकनाथ खडसेंचा मोठा दावा

एकनाथ खडसे म्हणाले की, “मी पहिल्याच दिवशी सांगितले आहे की, जर माझा जावई चुकीचा असेल, तर मी त्याचे समर्थन करणार नाही. हे सर्व कोर्टात सिद्ध होईल. पण या संदर्भात रूपालीताई चाकणकर ज्या काही गोष्टी बोलत आहेत, त्याला काहीतरी आधार पाहिजे की नाही?”

पुढे खडसे यांनी म्हटले की, “एका तरी मुलीने पुढे येऊन सांगावे की माझा लैंगिक छळ झाला, माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार झाला, जबरदस्तीने माझे फोटो काढले, किंवा मला डांबून ठेवले. अशी एकतरी तक्रार यावी. जर संमतीने सगळे झाले असेल, तर तुम्ही त्यात काय सांगू शकता? मग जर कोणाची तक्रारच नसेल तर… मी काही समर्थन करत नाही, पण कायद्यानुसार ते खासगी आहे. जर जबरदस्ती झाली असेल, तर सगळ्या गोष्टी पुढे येतात. संमतीने असो किंवा कोणत्याही प्रकारे, हे करणे गैर आणि घातक आहे.”

“मुलीने पुढे येऊन सांगावं की माझा छळ झाला”

खडसे पुढे म्हणाले की, “कोणत्याही महिलेने म्हटले नाही की, माझ्यावर बळजबरी झाली, माझ्यावर बलात्कार झाला. या क्षणापर्यंत पोलिसांकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. रूपालीताईंच्या माध्यमातून हे वारंवार काढले जात आहे. माझा यात काय संबंध आहे? आहे तो जावई, पण मी काय त्याला सांगितले की असं कर? रोहिणीने सांगितले की असं कर? मग उगाच जावई… रोहिणीताई… आता तुमचे जावई घरात काय करतात, तुमचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यावर काय करतो… दारू पितो का की… अजून काही. शेवटी बाहेर गेल्यावर तो त्याचा खासगी प्रश्न आहे.”

एकनाथ खडसे यांनी असेही म्हटले आहे की, “आम्ही त्याला (प्रांजल खेवलकर) सांगत नाही की, बाबा बाहेर जाऊन ड्रग्ज घे, पोरींना बोलाव… हे काय नाथाभाऊंनी शिकवलं नाहीये. उगाच राजकारणासाठी आणि नाथाभाऊंना बदनाम करण्यासाठी, तसेच लोढा प्रकरणात लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व सुरू आहे,” असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. जावयाच्या रेव्ह पार्टीबद्दल त्यांनी पहिल्यांदाच थेटपणे आपली भूमिका मांडली आहे.

News Title: If Everything Happened With Consent… Eknath Khadse’s Direct Statement on Son-in-Law

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now