‘तुमचं विमान वेळेवर…’; एकनाथ खडसेंनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार

On: November 11, 2023 12:35 PM
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी फोनवरून (Eknath Khadse Call CM Eknath Shinde) संपर्क साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसतं तर माझ्या आयुष्याच विमान लँड झालं नसतं, असं म्हणत एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत.

एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सातऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली.

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना याबाबत फोन येताच त्यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात आले

मला हृदयविकाराचा त्रास झाला.  आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल, असं खडसेंनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

उच्च न्यायालयाचा राज ठाकरेंना मोठा दिलासा!

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप 

शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now