बीड विनयभंग प्रकरणाचा स्फोट! मुंडेंसोबत आरोपीचा फोटो, क्षीरसागरांवरही गंभीर आरोप

On: June 30, 2025 4:20 PM
Beed Molestation Case
---Advertisement---

Beed Molestation Case | बीड जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर, राजकीय वर्तुळात मोठे वादंग निर्माण झाले आहे. धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यावर एकमेकांवर गंभीर आरोप करत असल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे.

ही घटना 27 जून 2025 रोजी उघडकीस आली. बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने दोन शिक्षकांवर विनयभंगाचा आरोप करत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. राज्य महिला आयोगाने तात्काळ दखल घेत, संबंधित संस्थेच्या CCTV फुटेज हस्तगत करून इमारत सील करण्याचे आदेश दिले.

आरोपी शिक्षकांना अटक, राजकीय वाद सुरू :

या प्रकरणात प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोन शिक्षकांना अखेर 29 जून रोजी अटक करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने पवारला लिंबागणेश परिसरातून, तर खाटोकरला चौसाळा येथून अटक केली. दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Beed Molestation Case)

दरम्यान, संदीप क्षीरसागर आरोपींसोबत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, “गुन्हा दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपींसोबत होते,” असा आरोप केला आणि एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

Beed Molestation Case | धनंजय मुंडेंवरही उलट आरोप; फोटो व्हायरल :

या वादात नवा ट्विस्ट आला, जेव्हा आरोपी विजय पवार आणि धनंजय मुंडेंचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून, राजकीय पक्ष एकमेकांवर दोषारोप करत आहेत. यामुळे संपूर्ण प्रकरण आणखीनच गडद बनले आहे. (Beed Molestation Case)

शैक्षणिक संस्थेतील घडलेली ही घटना अत्यंत लज्जास्पद असून, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी असे कृत्य केल्याने संपूर्ण समाजात गैरसमज पसरतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

News Title: Beed Girl Molestation Case: Political War Over Accused’s Link With Munde and Kshirsagar, Both Sides Under Fire

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now