Edible Oil Rate l देशात सणासुदीला सुरुवात झाली असून रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी हे सण साजरे झाले आहेत. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असून यानंतर नवरात्रीचे आगमन होईल आणि दसरा, दिवाळी हे सण येतील. दरवर्षीप्रमाणे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होत असते. मात्र यंदाच्या वर्षी सरकारने खाद्यतेल महाग होणार नाही याची काळजी घेतली आहे.
सणासुदीच्या काळात तेलाच्या किंमती वाढणार का? :
दरवर्षी सणासुदीच्या काळात खाद्यतेल, तांदूळ, मैदा इत्यादी खाद्यपदार्थांच्या किमती वाढतात . मात्र यंदाच्या वर्षी असे होऊ नये म्हणून केंद्रातील मोदी सरकारने खाद्यतेल कंपन्यांना किरकोळ किमतीत वाढ करू नये, असे सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी केंद्राने देशांतर्गत तेलबियांच्या किमतींना समर्थन देण्यासाठी अनेक प्रकारच्या खाद्यतेलांच्या बेसिक कस्टम ड्युटी (BCD) मध्ये वाढ केली होती. 14 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने आपल्या निर्णयात खाद्यतेलांवरील आयात शुल्कात वाढ केली होती, त्यानंतर सोयाबीन तेल, रिफाइंड, पामतेल यांसारखी खाद्यतेल महाग होण्याची स्पष्ट शक्यता होती.
Edible Oil Rate l केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना दिल्या सूचना :
यासंदर्भात केंद्र सरकारला माहीत आहे की, कमी बेसिक कस्टम ड्युटीवर आधीच आयात केलेल्या सुमारे 30 लाख टन तेलाचा साठा आहे, जो 45 ते 50 दिवसांच्या घरगुती वापरासाठी पुरेसा आहे. त्यामुळेच सध्याचा साठा शिल्लक राहूपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नयेत अशा सक्त सूचना केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना दिल्या आहेत.
सरकारने खाद्यतेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना अलीकडेच आयात शुल्क लागू केल्यानंतर खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत वाढ न करण्यास सांगितले आहे. सरकारने म्हटले आहे की ऑइल प्रोसेसरकडे कमी किमतीत पाठवलेल्या खाद्यतेलाचा पुरेसा साठा आहे आणि त्यामुळे त्यांनी तेलाच्या किमती वाढवणे टाळावे.
News Title : Edible Oil Rate News
महत्वाच्या बातम्या –
कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु
अजितदादांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला
बँकेची काम आजच उरकून घ्या, सलग 4 दिवस बँका बंद राहणार
जोरदार उसळीनंतर सोनं पुन्हा झालं स्वस्त; सध्या काय आहेत किंमती?
ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार






