Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करत नव्याने चौकशीची मागणी केली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या दुर्घटनेतील काही बाबी संशयास्पद असल्याचे सांगत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी भूमिका मांडली आहे.
विमान अपघातातील घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह :
अजित पवार (Ajit Pawar) यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या खासगी विमानाला लँडिंगच्या वेळी अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. लँडिंगपूर्वी विमानाने आकाशात गोल फेऱ्या मारल्या, एका बाजूला झुकले आणि त्यानंतर स्फोट झाला. लँडिंगनंतरही विमानात दोन स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घटनांमुळे अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.
या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या अपघाताची पुन्हा सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वीच चौकशीची मागणी केल्याचे सांगत, त्या मागणीला आपण पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (CID investigation demand)
Ajit Pawar | सीआयडी चौकशीवर शंका, हायकोर्ट नियंत्रणाची मागणी :
अनिल देशमुख यांनी या अपघाताबाबत सांगितले की, काही ज्येष्ठ नेत्यांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. अपघातासाठी कमी दृश्यमानता कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्या ठिकाणच्या व्हिडीओंवरून ते कारण पटणारे नसल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्रालयानेही व्हिजिबिलिटीचा मुद्दा उपस्थित केला असला तरी लोकांचा त्यावर विश्वास बसत नसल्याने स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. (Anil Deshmukh statement)
ते पुढे म्हणाले की, “मी गृहमंत्री होतो, त्यामुळे सीआयडी कशी चौकशी करते हे मला चांगले माहीत आहे. डीजीसीआय किंवा सीआयडी चौकशी करतील, पण ही चौकशी हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली झाली तरच सत्य समोर येईल.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, या चौकशीत नेमकं काय घडलं हे लोकांसमोर आलंच पाहिजे. यासोबतच त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट झाल्यास खासगी विमानाने प्रवास टाळण्याचा सल्ला देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.








