आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरी ईडीची धाड, राजकीय वर्तुळात खळबळ

On: June 6, 2025 11:54 AM
Aditya Thackeray
---Advertisement---

Dino Morea ED Raid | मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर ईडीने सकाळी ८ वाजल्यापासून छापेमारी सुरू केली आहे. डिनोवर आणि त्याच्या भावावर याआधी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही चौकशी करण्यात आली होती. डिनो मोरिया हा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांचा निकटवर्तीय मानला जातो.

या प्रकरणातील छापे केवळ मुंबईपुरतेच मर्यादित नसून, कोची (केरळ) येथील ठिकाणीही ईडीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक नवीन पैलू समोर येत आहेत. ईडीने १५ पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. (Dino Morea ED Raid)

65 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, डिनो मोरियावर संशय :

मुंबई महापालिकेच्या मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पासाठी 1100 कोटी रुपयांचं कंत्राट 18 कंत्राटदारांना देण्यात आलं होतं. या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचं समोर आलं आहे. या गैरव्यवहारामुळे पालिकेचं 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा गंभीर आरोप आहे.

या प्रकरणात डिनो मोरिया (Dino Morea ED Raid) व त्याचा भाऊ सॅन्टिनो यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून 8 तास सखोल तपास करण्यात आला होता. आरोपी केतन कदम व डिनो मोरिया यांच्यात 2019 ते 2022 दरम्यान आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

Dino Morea ED Raid | आरोपींच्या आर्थिक नेटवर्कची तपासणी सुरू :

केतन कदमला अटक झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार, डिनो मोरिया आणि केतन कदम यांच्यात दीर्घकाळपासून व्यावसायिक संबंध होते. या व्यवहारांमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा संशय आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीकडून बँक खात्यांची पडताळणी, लेखापरीक्षण आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदार कंपन्याही तपासाच्या कक्षेत आल्या आहेत. (Dino Morea ED Raid)

Dino Morea ED Raid | 20 वर्षांपासून सुरु असलेला प्रकल्प व चौकशीची गरज :

मिठी नदीतील गाळ उपसण्याचा प्रकल्प 20 वर्षांपासून सुरु आहे. मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही कामातील दर्जा आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर ईडीकडून चौकशी सुरू असून, ऑडिट फर्मच्या माध्यमातून आर्थिक हिशेबांची तपासणी केली जाणार आहे. पुढील काही दिवसांत आणखी छापेमारी आणि अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News Title: ED Raids Actor Dino Morea’s House in Mithi River Scam Worth ₹65 Crore

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now